दिल्ली मुक्कामात असतांनाच जाण्याच्या आदल्या रात्री, सगळे एकमेकांशी निरोपाची बोलणी करत असतांना, सरांनी एलाना आणि ब्रैडला संतोष त्यांच्या बरोबर न येता; आता इथेच राहणार असल्याची बातमी हलकेच दिली. ब्रैडने काळजीने एलानाकडे बघितले. तिने हळुवार हसत त्याच्या काळजीयुक्त नजरेला नजर भिडवली. "हो, त्याला प्रमोशन मिळालंय ना? मग आता इथे थांबावं लागणार त्याला. कल्पना आली होतीच मला त्याची. आणि इंडियात राहून त्याला त्याच्या घराकडे, त्याच्या आई वडिलांकडे लक्ष पुरवणं सोपं जाईल. हो ना? त्यांनी तरी किती काळ दूर राहावं त्याच्या पासून?"
Tuesday, June 6, 2023
फिजेट स्पिनर भाग ९ (मेघा कुळकर्णी)
फिजेट स्पिनर भाग ८ (मेघा कुळकर्णी)
होता होता महिना कसा संपत आला कोणालाही कळले नाही. शेवटचे काही दिवस मथुरा, वृन्दावन, आग्रा, फत्तेपूर सिक्री वगैरे करून दिल्लीहून विमानाचं तिकीट काढून लंडनहून नेदरलँड्सला जाण्याचे पाहुण्यांनी ठरवले.
फिजेट स्पिनर भाग ७ (मेघा कुळकर्णी)
मुंबईत हिंडतांना दुपारचे जेवण जुहूला इस्कॉनच्या मंदिरातच घ्यावे हेही त्यांनीच सुचवले. अप्रतिम जेवण तिथे मिळेल असे त्यांनी सांगितल्याने दुपारी सगळे जुहूला गेले.
फिजेट स्पिनर भाग ६ (मेघा कुळकर्णी)
मुंबईला उतरल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला रिसीव करायला अजितसरांबरोबर त्याचे आई,बाबा आणि दोघी बहिणीही आल्या होत्या. सरांनी त्यांना बोलावून घेतलं होतं. संतोषला बघितल्यावर त्याच्या आईने त्याला मिठीत घेऊन अक्षरशः आसवांनी न्हाऊ घातलं होतं. एलाना भरलेल्या डोळ्यांनी ते दृष्य बघत उभी होती. त्या दोघांची संतोषच्या कुटुंबाशी सरांनी ओळख करून दिली. एलानाने संतोषला परमुलखात आईचं प्रेम दिल्याचं कळल्यावर एलानाचे हात हातात घेऊन संतोषच्या आईने तिचे हातही अश्रूंनी धुवून काढले. सरांच्या मुंबईतल्या घरी सगळ्यांचा नाश्ता-पाणी झाल्यावर सरांच्या कर्जतच्या फार्म हाउस कडे सगळ्यांनी कूच केली.
फिजेट स्पिनर भाग ५ (मेघा कुळकर्णी)
न जाणे किती काळ संतोष हातातलं स्पिनर गरगर फिरवत होंडीपकडे बघत बसला होता. दूरवरून गावातून मदर मेरी चापेलमधून सायंप्रार्थनेची घंटा घणघणायला लागल्यावर तो दचकून भानावर आला. विश्वरुपीमातेच्या देवळात आरती होतांना होणारा घंटानाद आठवून गेला त्याला. एक सुस्कारा टाकून घरी जाण्यासाठी तो उठला.
फिजेट स्पिनर भाग ४ (प्रणव जतकर)
संतोषच्या यशाचा आनंद फ़क्त एकाच माणसाला नीट घेता येत नव्हता... अजित सर...!! मुजूमदार साहेबांनी किती कमी पैश्यात भोळ्या संतोषला गटवलं आहे हे फ़क्त त्यांनाच कळत होतं. पण कंपनी पॉलिसीमुळे बोलताही येत नव्हतं. संतोष परदेशात असला तरी अँमस्ट्रडॅमसपासून कित्येक मैल एका फ़ार्महाऊसवर राहणार होता आणि तिथे जेमतेम भागेल येवढेच पैसे मिळणार हे त्यांना माहित होतं. पैसे द्यावे लागले तरी निदान त्याची काळजी नीट घेतली जावी म्हणून पंधरा वर्षांपूर्वी अजित सर स्वत: राहात असलेल्या ब्रॅड आणि ऍलानाच्या फ़ार्मवर त्याची नेमणूक व्हावी येवढंच त्यांच्या हातात होतं आणि त्यांनी ते संतोषसाठी केलं...!!
फिजेट स्पिनर भाग ३ (प्रणव जतकर)
बापाचे उरले-सुरले पैसे आणि मळ्यातली फ़ुलं घेऊन संतोष पुन्हा तालुक्याच्या बाजारात उभा राहिला. झेंडू आणि शेवंतीच्या ढिगांमध्ये त्याची ती इंपोर्टेड फ़ुलंच गावठी दिसत होती. पाण्याखाली धरलेला श्वास गुदमरत असतानाच देवदूत दिसावा तसे अजित सर मोठ्या आश्चर्यकारक मुद्रेनं त्याच्याकडे येताना दिसले. शहराकडचा माणूस आपल्याकडे येतोय, थोडी तरी फ़ुलं विकली जातील अश्या आशेने संतोष थोडा सरसावून उभा राहिला. अजित सर त्याच्या जवळ येऊन मोठ्या आनंदाने विचारु लागले... "अश्या छोट्याश्या गावच्या बाजारात बटर कप आणि फ्लॉवर कप? कुठून आणलेस रे ही फ़ुलं?" आपल्या कष्टांचा कुणी जाणकार भेटल्याचं बघून परमुलुखात आपली भाषा कळणारं कुणीतरी भेटल्याचं समाधान संतोषला झालं. तो अगदी उत्साहाने मनापासून त्याला असलेली माहिती अजित सरांना सांगू लागला.
फिजेट स्पिनर - भाग २ (प्रणव जतकर)
तीन वर्ष डिप्लोमा पूर्ण करून संतोष पुन्हा आपल्या गावी देवळाला परत आला. आपल्या घराण्यात कॉलेजापर्यंत जाऊन आलेला आणि संपूर्ण गावात फ़्लोरीकल्चर शिकलेला एकमेव तरणाबांड वीस वर्षाचा मुलगा बरोबर घेऊन फ़िरताना संतोषच्या बापाची छाती अभिमानाने फ़ुलून यायची. पण फ़ुगवलेल्या छातीखाली रिकामं पोट असल्यावर किती दिवस कौतुक टिकणार? येवढा कॉलेजात शिकून आल्यावर शेतीत काहीतरी चमत्कार करून घरात पैश्याच्या राशीच्या राशी आण्याव्यात हे त्याच्या अडाणी आईबापाला वाटलं तर त्यात गैर काहीच नव्हतं. पण असल्या कडक उन्हात फ़ुलशेती करायची तर ग्रीन हाऊस पाहिजे, ड्रिप पाहिजे, छोटं पंप हाऊस पाहिजे तरच काहीतरी करणं शक्य आहे हे संतोषने सांगितल्यावर त्याच्या बापाला घामच फ़ुटला. आता पैसा मिळवायचा तर आधी गुंतवणूक केली पाहिजे हे त्याला कळत होतं. पोरगं इतकं शिकलंय म्हणजे काहीतरी नक्की करुन दाखवेल ह्या आशेवर संतोष म्हणेल ते-ते सर्व त्याच्या बापाने केलं.
फिजेट स्पिनर भाग १ (प्रणव जतकर)
’इफ़ यु वॉन्ट टू लिव अस देन लिव बिफ़ोर इट्स टू लेट’.. थरथरत्या आवाजात बोललेले म्हाताऱ्याचे आर्त शब्द तप्त शिश्यासारखे त्याच्या कानातुन खोलवर घाव करत काळजात उतरले. गेल्या चार वर्षात ब्रॅड आणि ऍलानाने त्याच्यावर अगदी पोटच्या मुलासारखं प्रेम केलं होतं. ग्रोनिन्जीन शहरापासून कित्येक मैल दूर असलेल्या मोक्कनबर्ग जवळ फ़ार्महाऊसवर राहणार्या त्या दोघांच्या फॅमिलीचा तो अविभाज्य घटक कधी बनला हे त्या तिघांच्याही लक्षात आलं नाही. येवढंच काय फ़ार्महाऊसवरच्या जर्सी गाई, ब्रॅडचा लाडका घोडा ’मॉन्टी' आणि जर्मन शेफ़र्ड जातीचा कुत्रा ’ब्राऊनी’ ह्यांनासुद्धा त्याचा लळा लागला होता. हे सगळं काही ठरवून झालं नव्हतं. मागच्या चार वर्षात होत गेलं. आणि आता अचानक ब्रॅडकडून हे निर्वाणीचं बोलणं ऐकुन त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. नेहमीचा रस्ता सोडून त्याने होन्डीप नदीच्या दिशेला गाडी वळवली.
माझ्या ब्लॉगची जन्मकथा
नारळ फुटी
बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...
-
देव आहे की नाही हा विषय जगातील कुठल्याही धर्मात... जातीत... पोटजातीत... स्त्री-पुरूषात... कुठल्याही महिन्यात... ऋतुत... सणवारांत... विवादा...
-
ऑ स्ट्रेलियामध्ये एकूणच सुपरलोटो , जॅकपॉट , घोड्याच्या रेस आणि कॅसिनोचं खूप वेड आहे. टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये लॉटरीच्या जाहिराती अगदी सर्...
-
मी बारामतीला इंजिनीयरींगला असताना तिथे ’जाणता राजा’ नाटक आलं होतं. मराठी नाट्यसॄष्टीमधलं सगळ्यात भव्यदिव्य नाट्य... महानाट्य...!! एकाच वे...