बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहावे हा नेमक्या वेळी छळणारा प्रश्न... मग ठरवले की स्वत:चे एक असे पोर्टल काढायचे की त्यावर वाट्टेल ते... वाट्टेल तेव्हा लिहुन काढायचे...! बरं ’अगदी वाट्टेल ते लिहीलयं’ हे मत वाचकाचं होण्याच्या आधीच आपण स्वत:च मान्य करायचं की ’हे आपलं असचं’ लिहीलय...! अहो एकदा ’हे आपलं असचं’ म्हटलं ना की वाचकांच्या आपल्या लिखाणाकडुन असणार्या अपेक्शांचं ओझं नाही वागवावं लागत...! आणि मग त्या हलक्या-फुलक्या जाणिवेमधुन खरोखर मनापासुन वाटणारे... मनापासुन येणारे विचार प्रकटायला सुरुवात होते...! साध्या नोकरीच्या इंटरव्ह्युचं बघा ना. आपल्याला एखाद्या नोकरीची फारशी गरज नसताना... सिलेक्शन झाले-झाले नाही-नाही... असा दिलेला इंटरव्ह्यु जास्त प्रभावी ठरतॊ. तिथे लगेच सिलेक्शन होते. जिथे खरोखर सिलेक्शन व्हावं असं वाटत असतं तिथे ते होईल की नाही ह्या धास्तीने परफोर्मन्सवर परिणाम होतो आणि काम होत नाही... आपण मात्र नियतीच्या नावाने खडे फोडत राहतो... जिथे जायचे होते ते दार बंद आणि जिथे येण्यात फारसा रस नव्हता तिथे आयुष्य घालवावे लागण्याची भिती बाळगतो...!
माणसाला आयुष्यात खरोखर काय पाहिजे ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर ’त्याच्याकडे जे नाही ते’ हेच असु शकेल...! जमिनीवरच पण शांत झोपणार्या कष्टकर्याला पलंगाची, मऊ गादीची आणि उबदार दुलईची ओढ असते आणि हे सगळं असणार्याला झोपच लागत नसते...! एखादी वस्तु घेण्याची ओढ ती वस्तु घेईपर्यंतच... एकदा का ती वस्तु मिळाली की ओढही संपते आणि त्यामागे पळणेही... म्हणजे एखादे काम ’साधले’ नाही ते ’संपले’... मला वाटतं की ह्याचमुळे माणुस रोज नविन नविन साध्य ठेऊन त्यामागे धावत असावा... ह्यातुनच सुरु होते धडपड रोज काहीतरी नविन मिळवण्याची. पण मग ह्यात काही गैर आहे का? म्हटलं तर नाही म्हटलं तर हो सुद्धा...!
रोज नविन साध्य किंवा एखादे टारगेट साधल्यावर पुढचे टारगेट ठेवणे म्हणजेच आयुष्य क्रमत रहाणे... त्यानेच जीवनाला गती राहील, माणुस कार्यरत राहील. वाईट विचारांपासुन, सवईंपासुन, व्यसनांपसुन, संगतीपासुन दुर राहिल... म्हणतात ना empty mind, devil's house. असे अनेक फायदे असताना आपण लोकांना दुसर्या विचाराकडे प्रव्रुत्त होताना का बघतो? ह्या प्रश्नाचे उत्तर असेल ह्या नाण्याच्या दुसर्या बाजुला... साध्य इतकीही ठेउ नका की तुमचे आयुष्यच एक मोठं साध्य होऊन बसेल... ते इतके मोठेही ठेऊ नका की त्याचा पोपटाचा डोळाच व्हावा आणि तुम्हाला दुसरे काही दिसणारच नाही... anything excess is poison म्हणतात ना तश्यातला प्रकार आहे थोडक्यात... भारतीय भोजन पद्धतीत जसे सगळ्या चविंना प्राध्यान्य दिले गेले आहे तद्वत आयुष्यातही सगळ्याचा समतोल साधता यायला हवा. तसच काहीसं 'हे आपल असचं' मध्ये साधण्याचा प्रयत्न असेल माझा. ह्यात काही फार 'अपेक्षा' ठेऊन वाचाल तर 'अपेक्षाभंग' होण्याचीच 'अपेक्षा' ठेवा...! 'हे आपल असाचं' असण्याचा मुल उद्देश्य हाच आहे कि ह्यात वाट्टेल ते लिहिता यावं...!
बरं सर्वसामान्य ब्लॊगर्ससारखा मी संकुचित द्रुष्टीकोन न ठेवता एखाद्या लोकनायकासारखा भव्यदिव्य द्रुष्टीकोन ठेऊन मी एक काम निश्चीत करणार आणि ते म्हणजे इथे फक्त माझेच विचार आणि लेख न ठेवता ह्या वेबदुनियेच्या छोट्याश्या कोपर्याला सजवु पाहणार्या प्रत्येक रसिकाला आपल्या विचार प्रकटनाची संधी मी इथे देणार आहे...! ह्यात मला चांगले साहित्य इथे पोस्ट करायला मिळेल हा माझा स्वार्थ...!
बाकी भेटत राहुच... कशासाठी काय विचारताय...? वर लिहीलं आहे ना... हे आपलं असच...!
आपला-
प्रणव जतकर
pranav.jatkar@gmail.com
Saturday, March 19, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझ्या ब्लॉगची जन्मकथा
नारळ फुटी
बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...
-
मी स्वत:ला खूप लकी समजतो... पणजी-पणजोबा... आज्जी-आजोबा ह्यांच्याबरोबर मला खूप सहवास मिळाला. पणजीच्या ह्या फोटोमुळं खूप आठवणी एकापाठोपाठ ...
-
मी बारामतीला इंजिनीयरींगला असताना तिथे ’जाणता राजा’ नाटक आलं होतं. मराठी नाट्यसॄष्टीमधलं सगळ्यात भव्यदिव्य नाट्य... महानाट्य...!! एकाच वे...
-
माझी एक चारोळी एकदा फिरून मलाच whatsapp वर फोरवर्ड म्हणून आली. खाली माझं initial सुद्धा होतं... PJ असं...!! पण लोकं पीजे म्हणुन फोरवर्ड क...
No comments:
Post a Comment