मी बारामतीला इंजिनीयरींगला असताना तिथे ’जाणता राजा’ नाटक आलं होतं. मराठी नाट्यसॄष्टीमधलं सगळ्यात भव्यदिव्य नाट्य... महानाट्य...!! एकाच वेळी चाळीस-पन्नास कलाकार स्टेजवर... वीस फुटांचे भव्य बुरुज... तेवढ्याच उंचीची तटबंदी... सहा फुटांपेक्षा भव्य अष्टभुजा देवीची मुर्ती... लोखंडाच्या तलवारीनं लढाया... लढाया खोट्या असल्या तरी त्यात खरेखुरे घोडे, खरे उंट आणि शिवरायांच्या राज्याभिषेकाला स्टेजसमोरुन जाणारा प्रत्यक्ष हत्ती...!! सगळंच एकदम भव्यदिव्य.
ह्यातले मावळे आणि सैन्य दाखवायला नाट्यसंस्थेकडून लोकल कलाकार (कलाकार कसले... हट्टेकट्टे आणि उंच... मावळे म्हणुन शोभतील असे... माझ्यासारखे... युद्धात गर्दी वाढवायला...!!) भरती करुन घेतले जात. माळ्यावरुन डबे काढणे, उंचीवरची जळमटं काढणे आणि पंखा पुसुन घेणे ह्याखेरीज उंचीचा काही उपयोग नसतो अश्या मानसिकतेवर डायरेक्ट ’जाणता राजा’ मध्ये शिवाजी महाराजांचा मावळा म्हणुन कुणी काम देतंय हे माझ्यासाठी अगदी नायक पिक्चरमधल्या अनिल कपूरसारखं एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याचं फिल होतं.
आधी नऊ-दहा दिवस आनंद सरांनी सराव करायला म्हणून एक लग्न कार्यालयाच्या हॉलमध्ये वेळ ठरवुन दिली. कॉलेज संपलं की आमची टोळी तिथे जमे. संपुर्ण नाटक मुख्यत: बाबासाहेब पुरंदरेंच्या आणि बाकी कलाकारांच्या आवाजात रेकॉर्डेड होतं. प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोगसुद्धा कॅसेट लावूनच केला जातो. कलाकार फक्त हातवारे आणि अभिनय करत असतात. ह्या सरावाच्या वेळी रांझ्याच्या पाटलाचा रोल मला मिळाला होता. महाराजांसमोर गुन्हा कबूल होतो... मी ’वाचवा म्हाराज वाचवा’ म्हणत महाराजांच्या पायाशी पडतो आणि बाकी मावळे मला उचलून घेऊन जातात... माझे हात-पाय तोडायला. हा ऐंशी किलोचा पाटील रोज चार-पाच वेळा उचलून मावळे मंडळी चांगलीच कावली होती. एक-एक प्रसंग घोटवुन घेऊन मग पुढचा असं करत दहा दिवसात अख्खं नाटक बसवून झालं.
नाटकाचा प्रयोग सुरु करण्यापुर्वी अगदी सत्यनारायण असल्यासारखी तयारी असे. स्टेजजवळ आस-पास धुराळा उठू नये म्हणून पाण्याचा सडा टाकला जाई. चेंजींग रुममध्ये तर अगदी लगीन घाई असे. सगळ्यात मजा म्हणजे ह्या प्रयोगासाठी आणलेली हत्तीणसुद्धा सजवली जाई. त्या हत्तीणीच्या मस्तकावर डिझाईन काढायचं ठरलं. त्यात कुणीतरी म्हणलं की प्रणवला सांगा... त्याची चित्रकला चांगली आहे. तुम्हाला सांगतो, दोन फुटावर हत्तीचं भलंमोठं मस्तक असताना खुर्चीवर उभं राहून त्याच्या खडबडीत सोंडेवर खडूने डिझाईन काढण्याचा अनुभव म्हणजे अजबच होता. पहिल्या दिवशी ह्या हत्तीणीच्या समोर उभा राहिलो तर तिने सोंडेने माझ्या कमरेभोवती विळखाच घातला. म्हणलं करतीये आता माझा टांगा पल्टी... पण लहान बाळ नुसतं खेळण्याला चाचपून बघतं आणि सोडुन देतं तसं काहीसं त्या हत्तीणीनं केलं. नंतर मात्र आमची दोस्ती झाली. मी मस्त ओम आणि बाकी डिझाईन काढत असे तिच्या गंडस्थळावर.
प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग सुरु झाल्यावर तर अजुनच मजा यायची. ह्या स्टेजवर दोन दहा-पंधरा फुटी बुरुज असतात. एक आलार्म बेल वाजते आणि ते महाकाय बुरुज मोटारने फिरतात. पुढुन किल्ल्याचा सेट आणि बुरुज फिरला की राजदरबारातला सेट अशी नाटक चालू असताना सारखी अदला-बदल होत असते. हे फिरते बुरुज आणि सरकतं स्टेज ह्याकडे लक्ष ठेऊन मागेच असलेल्या चेंजींग रुमकडे जावं लागे. अंगात एक पांढरा कुडता आणि सुरवार तशीच ठेऊन, वरचा गेटअप बदलायचा हे काम असे. झगझगीत जरीचा लाल-हिरवा अंगरखा अडकवून डोक्यावर मुघली सरदाराची टोपी घातली की मुघल सरदार... आणि ते काढून टाकून लाल रंगाचं मर्द मराठ्याचं मुंडासं डोक्यावर घातलं की झाला महाराजांचा मावळा. अशी पात्रं बदलून-बदलुन मी सोळा वेळा मावळा आणि सहा वेळा मुघल सरदार म्हणून स्टेजवर जात असे. शेवटच्या दोन प्रयोगांत माझी निवड अष्टप्रधान मंडळात झाली. ह्या लोकांना स्पेशल बाराबंदी मिळत असे. चेंजींग रुममध्ये मुघली टोपांचा, मावळ्यांच्या मुंडाश्यांचा, चापाच्या कानातल्यांचा आणि पत्र्याच्या तलवारींचा ढीग लागलेला असे. वेळेत पात्रबदल करुन स्टेजवर पोचायची अगदी झुंबड उडे. लढाई करताना देखिल काळजी घ्यावी लागे. कारण लढाई खोटी असली तरी तलवारी लोखंड्याच्या होत्या. त्यात ती लढाई अंधारात आणि विजा कडाडल्यासारख्या दिव्याच्या प्रकाशात होत असे. त्यामुळे तलवार लागण्याची भीती.
वर्षानुवर्ष ह्या नाटकाचे प्रयोग होत आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांचं काम करणार्या ’प्रविण शिरोळें’पासून सगळी मंडळी कसलंही मानधन न घेता हे काम करत आहेत. त्यात विविध भुमिकांमधुन अतिशय अप्रतिम काम करणारा ’चिन्मय पाटसकर’ तर टिव्ही कलाकार आहे. ह्या सगळ्या लोकांबरोबर येवढ्या मोठ्या नाट्यात छोटासा का होईना अनुभव मिळणं हे खुप महत्वाचं होतं. बाबासाहेब पुरंदरेसुद्धा स्वत: ह्या नाटकाच्या निमीत्ताने आम्हाला रोज भेटत होते. त्यांचं इतकं बारीक लक्ष होतं प्रत्येक मावळ्याच्या कामावर की विचारु नका. दुसर्या दिवशी आधल्या प्रयोगाबद्दल सुचना आणि सुधारणा ते सांगत. ह्या ऋषीतुल्य माणसाच्या नसानसांत शिवाजी किती भिन्नलाय हे अगदी जवळून बघायला मिळालं.
महाराष्ट्राच्या संपन्नतेच्या गीतापासून सुरु झालेलं हे महानाट्य छत्रपतींच्या राज्याभिषेकापाशी संपतं. छत्रपती, हातपाय थरथरणार्या राजमाता जिजाऊ, अष्टप्रधान मंडळ, गागाभट्ट आणि समस्त दरबारी मंडळी स्टेजवर प्रेक्षकांच्या समोर येतात आणि ह्या नाटकाचा पडदा पडतो. ह्या क्षणाला स्टेजवरचा प्रत्येक माणूस एका वेगळ्याच विश्वात गेलेला असतो. भारावलेल्या अवस्थेत... शिवमय झालेला...!! रायगडावर सदरेसमोर उभं राहून जे फिलींग येतं तेच... तसंच... काहीतरी वेगळंच... शब्द तोकडे पडतायत... सांगतासुद्धा येत नाही असे...!!
महाराष्ट्र... जगदंब... जिजाऊ... भवानी... शिवराय... शिवराय... शिवराय...!! छत्रपती शिवराय...!!!
प्रणव.

काही महिन्यांनी एखादा मावळा असाच स्वतःचा अनुभव सांगेल. काय भिनले आहेत महाराज लेखकाच्या नसनसात
ReplyDelete