ज्यांच्या कालनिर्णयाशिवाय आम्ही कसला निर्णय घेतला नाही... इतकी घरं बदलली पण भितींवरी कालनिर्णय असू दिलं... त्यांना आज 'तुम्हीच का ते बृट्स...!?' असं विचारायची वेळ आली आहे.
आई बाबा इथे होते तेव्हा चतुर्थी, अमावस्या-पौर्णिमाच काय... कुमार षष्ठी, दुर्गाष्टमी, शनिप्रदोष पासून एकादशी भागवत आहे की कामिका आहे इथपर्यंत सगळं कळत होतं.
गेले काही दिवस कामामुळे मरायला सवड नसल्याने कालनिर्णय सोडा फेसबुक-व्हाट्सअँप सुद्धा बघायला वेळ होत नव्हता. त्यात पुण्याहून येताना चुकून हे हिंदी कालनिर्णय आणलं. जाता येता कधीतरी लक्ष गेलं 'श्रावण मासारंभ'... २० जुलैलाच.. ते पण पौर्णिमेनंतर..!?
बरं आपल्याला काय? साळगांवकर म्हणतील ती पूर्व दिशा. मुकाट्याने फ्रिजातली राहिलेली चार-पाच अंडी 'कॅनिंगार्पण' (तिकडे गंगा तशी इथे कॅनिंग हो) केली. अपेयपान आणि अभक्षभक्षण अनियमित काळासाठी स्थगित केलं. चांगली बॅलेन्टाईन स्कॉच मिळाली होती ऑफरला ती पण माळ्यावर टाकून दिली. श्रावण म्हणजे श्रावण...!!
पण हाय रे माझ्या कर्मा... श्रावण अजून सुरु व्हायचाच आहे. ह्या दगाबाज कालनिर्णयाने घातवार छापलेत तर..!!
आत्ता परवा ही गोष्ट लक्षात आली. पुढचे काही दिवस हे सत्वगुणी जाणार आहेत ह्यापेक्षा हक्काचे तामस आणि रजोगुणी दिवस ह्या साळगावकराच्या प्रिंटिंग मिस्टेकमुळे वाया गेल्याचं दुःख अपार आहे. आज की रात... आखरी रात... कयामत की रात...!!
चैन कुली की मेन कुली की चैन..!!
प्रणव.

No comments:
Post a Comment