Disclaimer: ज्या माता भगिनींना भेंडीची भाजी प्रचंड आवडते त्यांनी फक्त फोटो बघून सईकडे रेसिपी विचारावी अथवा फोटोला लाईक करून पुढे जावे. भावांना आवडत असेल असं मला वाटत नाही.
माझ्या घश्याखाली भेंडीची भाजी उतरवणं हे लहान मुलांना खोकल्याचं कडवट औषध पाजण्याइतकच अवघड आहे. चिकट तार येणारी चकत्यांची टिपिकल भेंडीची भाजी बघितली की माझा घास तोंडात घोळायला लागतो. ह्या भाजीकडे बघून पुर्वी नाराजीने आणि आता तणतणत मी टेबलावरून सभात्याग करतो.
मग भाजीत दाण्याचा भरपूर कुट घालून, भेंडी खरपूस कडकडीत परतून, कार्ल्यासारखी भरली भेंडी करून... विवीध मार्गांनी भेंडी माझ्या गळी उतरवण्याचा सईचा प्रयत्न सुरु होतो. त्याच प्रयोगातून शोध लागलेली डिश... 'शाही भेंडी'...!!!
आता नुसती क्रिमी ग्रेव्ही करून त्यात तळलेल्या भेंडीचे तुकडे टाकायचे आणि उगाच त्याला 'शाही' म्हणुन त्याचा भाव वाढवायचा... हे म्हणजे 'सिद्धार्थ जाधव'ला थ्री-पीस घालून 'जेम्स बॉंड ' म्हणण्यापैकी आहे...!! पण मुळ भेंडीचं हे बरचं खाणेबल रूप होतं हे कन्फेशन.
मुळात आपण भेंडी खातोच का हा माझा प्रश्न आहे. आदिमानव जेव्हा काय खाण्यास योग्य आणि काय अयोग्य हे वर्गीकरण करत होता तेव्हा काही गोष्टी त्याची नजर चुकवून खाण्याच्या यादीत आल्या. भेंडीनं दाखवलेला हा पहिला आणि शेवटचा स्मार्टनेस. बाकी एखाद्या वेडपटाला हिणवून बोलावतानासुद्धा 'ए भेंडी...sss ...!!' हीच हाक येते. अहो शेळीला खायला घालायची चव आणि लायकी ह्याची... माणुस खायला लागला...!!
लहानपणापासून माझ्या बहिणीला आवडायची म्हणुन आणि आता ऋचा ला आवडते म्हणुन ही माझी नावडती भाजी महिन्यातून एखादेवेळी का होईना माझं जेवण हैराण करतेच. आता इथपर्यंत सहनशीलता आणि चटणी-लोणच्याचे उपाय माझ्या अंगवळणी पडलेत.
मानवजातीची खरी कीव करण्याची वेळ आली जेव्हा पुण्याला फर्ग्युसन रोडवर आईस्क्रीम पार्लर निघालं ज्यात निरनिराळ्या भाज्यांच्या फ्लेवरच्या आईसक्रीममध्ये 'भेंडी फ्लेवर आईसक्रीम' मिळायला लागलं तेव्हा. अणुबॉम्बच्या शोधापुढे जशी मानवी क्रौर्याची सीमा संपते... तशी भेंडी आईस्क्रीमपुढे बुळबुळीतपणाची...!!!
प्रणव.

No comments:
Post a Comment