माझा बालमित्र. ऑस्ट्रेलियाला आला. पर्थला नाही… सिड्नीला. इथून तीन हजार किलोमीटर लांब. भेटावं वाटत होतं. संध्याकाळी बागकाम करत होतो आणि नेमका त्याचा फोन आला. ऑस्ट्रेलियाला आलोय रे म्हणला. म्हणलं अरे पर्थला येऊन जा ना. खूप आढे वेढे घेत होता. म्हणलं अरे भारतात जायला इथूनच जा. ऑन द वे आहे.. तरी जमणार नाही म्हणे..!!
मग मात्र मी चिडलो. म्हणलं तू डायरेक्ट गेलास तर तुझं विमान पर्थवरून जाताना दगड मारून खालीच पाडेन मी...!!
आणि एकदम मला काळजात चर्रर्र झालं. काय बोललो आपण हे? तिथेच बागेमध्ये मटकन खाली बसलो. डोळे आपोआप बंद झाले. अलगद सभोवती हात फिरवू लागलो.
सगळीकडे हाताला लागणारी मऊ मखमली वाळवंटी वाळू... अथांग...!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
च्यायला ह्या सोंड्याच्या विमानाला फेकून मारण्यासाठी एक पण दगड नाही...!!
आता काय फेकून मारावं असा विचार करतोय...!!
प्रणव

No comments:
Post a Comment