मी स्वत:ला खूप लकी समजतो... पणजी-पणजोबा... आज्जी-आजोबा ह्यांच्याबरोबर मला खूप सहवास मिळाला. पणजीच्या ह्या फोटोमुळं खूप आठवणी एकापाठोपाठ यायला लागल्या... वपुनी म्हणलेल्या वारुळातल्या मुन्ग्यांसाराख्या...!!
निगडीला असताना रोज सकाळी माझी पणजी श्रीसूक्त म्हणत फुलांचा हार... दुर्वांच्या जुड्या नाहीतर कापसाच्या वाती वळत बसलेली असे. एकीकडे बाबांची... म्हणजे माझ्या पणजोबांची देव पूजा चाललेली असे. पितळ्याची तिवई... त्यावर तांब्याचं ताम्हण... ताम्हणात देव ठेऊन तांब्याच्या गडुने अभिषेक देवाच्या डोक्यावर व्हायचा. पूजेत एक चांदीचा पत्रा लावलेला शंख होता. त्यात पाणी भरून त्यानेही देवाच्या मस्तकी शुद्धोदक समर्पित व्हायचं. सहाणेवर अष्टगंध कालवलं जायचं ते कापराच्या पाण्यात... आणि ते उगाळलं जायचं चंदनाच्या खोडानी. ते चंदनी खोडदेखिल अगदी गोल गरगरीत असायचं. उगाचच एकाच बाजूनी घासून चपटं झालेलं नव्हे. त्या अष्टगंधाच्या एकसारख्या आकाराच्या गोळ्या करून देवीदेवतांच्या मस्तकी चिकटवल्या जायच्या.
तिवई वरच्या ताम्हणातून गडुमध्ये तीर्थ जमा केलं जायचं. माझी पणजी तो तांब्याचा गडू घेऊन देवघराच्या उमर्यावर बसत असे. एकेकदा घरातल्या सगळ्यांचं घेऊन झालं की आम्हा मुलांना दुसर्यांदा मिळत असे. ते मिळावं म्हणुन आमची धडपड असे अगदी. चांदीच्या देवांवरून तांब्याच्या गडूत साठवलेलं ते कर्पुरमिश्रीत तीर्थ म्हणजे अगदी अमृतच. प्रत्येक देवाच्या डोक्यावर त्याच्या आवडीच्या रंगाचं फुल पडे. नैवेद्याला दुध-साखरेची वाटी आणि एक गुळ-खोबर्याची वाटी. ही जणु काही देवाच्या काळ्या मुंग्यांसाठीच ठेवली जाई. आजच्या पूजेनंतर ठेवलेली साखरेची वाटी दुसर्या दिवशीपर्यंत रिकामी होऊन जात असे... मुंग्यांकडुन...!!
दोन-अडीच तास येथासांग पूजा करून झाल्यावर माझे पणजोबा आणि पणजी मारुतीच्या दर्शनाला जात. पांढरं स्वच्छ धोतर, खादीचा क्रीम कलरचा शर्ट, त्यावर करड्या रंगाचं जाकेट आणि डोक्यावर काळी टोपी... हातात आधारासाठी शिसवी लाकडाची काठी असा जामानिमा अगदी वयाच्या ब्यायण्ण्याव्या वर्षीदेखील असायचा बाबांचा. बाहेर बागेत आले की पणजीला सांगायचे... 'अहो... गुलाब छान आलाय बरं का आज झाडावर...!!'
माझी पणजी आज्जी कोटनची नऊवारी साडी नेसून... बाबांनी खुणावलेला पांढरा गुलाब आंबाड्यात खोचून त्यांच्यामागे तुरु-तुरु चालत जात असे. ती त्यांच्या बरोबर कधीच चालली नाही. नेहमी चार पावलं मागे. आयुष्यातल्या साठ वर्षांहून अधिक काळ एकत्र घालवून एकमेकांचं आयुष्यच होऊन गेलेले हे प्रेमात्मे... कधी परमात्म्याला जाऊन मिळाले हे कळलंच नाही. आम्हाला मात्र पोरकं करून गेले.
देवाला वाहलेल्या फुलाचं आयुष्य सार्थकी लागतं पण हाती निर्माल्य तरी राहतं... आमच्या हाती राहिल्यात त्या फक्त आठवणी... रोज-रोज फिकट होत जाणार्या...!!
प्रणव.

No comments:
Post a Comment