परवापासून ह्या इहलोकातच नाहीये आम्ही... ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधरजी फडके ह्यांच्या सलग तीन मैफिली... एकत्र डिनर आणि मनसोक्त गप्पा...!!
गीतरामायणाच्या कार्यक्रमापासून सुरु झालेलं स्वर्गसुख.. बाबूजींच्या नॉस्टॅल्जीक बनवणारी भावगीतं... जी शुभं करोतिप्रमाणे पहिल्यांदा कधी ऐकली हेही न आठवणारी भक्तिगीतं... इथपासून ते 'फिटे अंधाराचे जाळे', 'काही बोलयाचे आहे', 'तुला पाहिले मी' करत करत कार्यक्रमाची सांगता 'सागरा प्राण तळमळला' हे बाबूजींच्या चालीमध्ये ऐकून कानापासून मन अगदी तृप्त होऊन गेलंय...!!
प्रत्येक गाण्याच्या चालीवेळची आठवण ऐकणं हे 'चेरी ऑन केक'... शांता शेळकेंपासून सुरेश भट आणि बाकी मोठमोठ्या कवीच्या आठवणीही लाजवाब.
सावरकर, बाबूजी आणि गदिमा... ह्या महाराष्ट्रातल्या तीन चमत्कारांना प्रत्यक्ष बघितलेल्याच नव्हे तर त्यांचा वारसा पुढे चालवणार्या श्रीधरजींबरोबर घालवलेले तीन दिवस ही आयुष्यभराची आठवण... साठवणीतील शिदोरी...!!
प्रणव

No comments:
Post a Comment