ऑफिसातला गोरा मित्र आणि मी गाडीतून बरोबर घेऊन जात होतो. रेडिओ सुरु होता. आमचा संवाद...
"काय रे ह्या एफ एम रेडिओचा कंटाळा नाही का येत तुला? एखादं इंडियन म्युझिक नाही का तुझ्याकडे?"
माझी दुर्बुद्धी... मी एका प्रसिद्ध गायिकेचा राग नंद लावला. "साजन मोरे घर आये..."
"ही काय म्हणत आहे? अर्थ सांग की.."
"साजन.. म्हणजे तिचा नवरा घरी आलाय."
"म्हणजे तो काय ऑन साईट होता का?"
"हो तसंच समज. तो बर्याच दिवसांनी आलाय म्हणून खुश होऊन गाणं म्हणतेय ती."
दुसर्या वाक्याला डबल उत्साहात परत प्रश्न.
"आता काय झालं पुढे?"
"काही नाही. परत तेच म्हणाली ती."
(दहा मिनिटांत अडतीस वेळा 'साजन मोरे घर आये' आळवलं बाईंनी.) तिकडे तिचं आणि इकडे ह्याचं सुरूच...
"अरे इतक्या दिवसांनी तो परत आलाय तर गाणं कसलं म्हणतेय ही.. ते पण एकच वाक्याचं गाणं..!!"
मध्येच बाईंनी 'आssss' करून आलाप-तान घेतली की ह्याच्या चेहर्यावर खट्याळ हास्य आणि लगेच मला प्रश्न...
"इज शी मोनिंग.!? इट लुक्स लाईक दे आर हॅविंग गुड टाईम नाऊ..!!"
माझी भारतीय अस्मिता फणा काढून उभी राहिली. रागाने मी...
"हा असला फालतूपणा भारतीय संगीतात नसतो. थोबाड बंद कर तुझं.. नाहीतर गाणं बंद करतो."
"कमाल करतो राव तू... कामसूत्र तुमच्याच देशात लिहिलं ना? कोट्यवधी लोकं तुम्हीच जन्माला घातली ना? मग ह्यात येवढं चिडायला काय झालं?"
"तू मागे म्हणाला होतास आठवतं का? वेस्टर्न कल्चरमध्ये एखादी बाई इंनर्समध्ये चुकून बघितलं तर भडकते पण तेवढंच अंग दाखवत असलेली बिकिनी मात्र पब्लिकली चालते..!!
आमची भारतीय अस्मिता तशीच आहे.. नागडेपणा तेवढाच असला तरी जागा चुकता कामा नये..!!"
प्रणव.

No comments:
Post a Comment