Monday, May 22, 2017

पंचाईत

          काही मित्र आप्तेष्टांना भेटायचं राहून गेलंय... आज थोडा वेळ आहे पण एक प्रॉब्लेम आहे... सॉलिड ऍसिडिटी झालीये...!!

आता कुणाच्या घरी जायचं म्हणलं तर चहा-नाष्टा तर कमीतकमी... खायला काही नको...!? असं कसं...!! इतक्या वर्षांनी इतक्या लांबून आला आहेस...!! थोडं घे. एका गुळाच्या पोळीने काय होतंय... घरचं तूप आहे वर...!! अगदी अर्धा कप चहा... का कॉफी करू? कप लहान आहेत. थोडी घे. अजून किती कमी करायची?
मान्य आहे पाहुणचार करावा वाटतो प्रत्येकाला... पण एखादेवेळी त्रास होत असेल तर...!? मला एखाद्याला नुसतं भेटून यायचं असेल तर? फार कमी वेळा ही समज दाखवली जाते. आणि बहुतांशी समज दाखवली तरी मागाहून गैरसमज करून घेतला नसेल ह्याची खात्री नाही.
एकंदरीत अवघडै... जाऊ दे घरीच बसतो आज...!!


प्रणव

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...