Monday, May 22, 2017

बिच्चारे देवबाप्पा

आज सकसकाळ पूजा सुरु झाल्यावर आमच्या देवांनीच भिंतीवरी कालनिर्णय शोधायला सुरुवात केली. आज पाडवा नाही, दसरा नाही, दिवाळी नाही... झालंच तर प्रणव महाराजांची परीक्षा, इंटरव्हूव, महत्वाची मीटिंग, इनक्रिमेंट... अगदी काही काही नाही... मग आज अचानक पूजा...!? समस्त त्रैलोकात हाहाकार उडाला...!!

घटका सरतो भगवंतास साक्षात्कार जाहला... सामोरे तीर्थरूप थोरले महाराज असून पुढील काही महिने आपणांस नित्य स्नान आणि राजवाड्याच्या परिसरातली निरनिराळी गंध-रंगाची फुलपत्री मिळणार...!!

एकच क्षण प्रफुल्लित झालेल्या विधात्याचा चेहरा पुन्हा काळजीत पडल्यासारखा दिसला... ह्या भर उन्हाळ्यात अशी रोज रोज अंघोळ सोसावेल नं पण... नाही शेवटी सवय असावी लागते हो...!!

प्रणव


No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...