Tuesday, May 23, 2017

"युवराज"

       


           'कुछ लोगों की उम्र बढती है लेकीन समझ नही।' ह्या मोदींच्या जळजळीत वाक्यालादेखील गोंडस गोजिरवाणं स्मित देणार्या लाडक्या युवराजाला कुठल्या दुष्ट कुबडीणीची दृष्ट लागली काय माहित.
तिने जाऊन राजमाँचे कान भरले. राजमाँने जळजळीत कटाक्ष टाकून समोर स्क्रीनवर युवराजाला मंद स्मित करताना बघितलं. झालं... तिच्या तळागाळाला गेलेल्या 'हाता'ची आग मस्तकाला गेली.
मागे वळून तिने युवराजाशेजारी बसलेल्या शिंद्यांच्या प्वॉराला हाक मारली. शिंद्यांचं प्वॉर आधी गळपटलंच. त्याच्यावर खेकसून राजमाँ म्हणाली, 'त्या येड्याच्या दे रे एक थोत्रीत...!! कुठे हसायचं कळतं का म्हणावं. चल घरी तुला दाखवतेच..!!'
       
          तुम्हाला सांगतो त्या क्षणानंतर ते हसू पुन्हा उमललंच नाही. राजमाँ सारखे नुसते हवेत हातवारे करून राह्यलेला वेळ काढावा लागला. ह्या दुष्ट मोदींचं भाषण संपूच नये असं वाटत होतं. कारण भाषण संपलं की घरी जावं लागणार आणि घरी गेलं की राजमाँ दारातच पाठीत धपाटा घालून 'मेल्याsss... फार दात काढत व्हतास नवं थितं..!!' म्हणत उत्तरपूजा घालणार हे माहित होतं.

          श्या: यार येवढं जमवून आणलेलं छान भाषण एका हसण्यामुळं वाया गेलं. वाटलं होतं राजमाँ मॅकडि मध्ये हॅपी मिल घेऊन देईल. पण 'पुन्हा त्यांच्या भाषणाला हसणार नाही आणि आज्जा गेल्यासारखं सुतकी थोबाड करून बसेन' हे दोनशेवेळा लिहून काढायची शिक्षा मिळाली.
जाऊ दे ब्वा... आता पुढच्यावेळी ते समोर बसलेले काका कोण होते.. त्यांच्यासारखं तोंडाला रुमाल लावूनच हसणार आहे..!! उगाच बोलणी खाणंच नको.

प्रणव.

सदर गोंडस फोटो खालील व्हिडिओमधून अस्मादिकांनी स्वतः घेतलेला आहे. 58:10 पासून पुढे हे शेवटचे हास्य...!!

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...