पंधरा-सोळा वर्षांपुर्वीची गोष्ट... आमच्या एका ओळखीच्यांच्या मुलीचं लग्न होतं. नवरा मुलगा इंदोरचा... अगदी टिपिकल लग्नाचं वातावरण. समोर सोफ्यावर कुणीतरी एक वयस्कर दिसणारी व्यक्ती बसली होती. सगळे त्यांच्या बाजुनी दबकुन हालचाल करत होते.. त्यांना अदबीने काय हवं नको ते विचारत होते. माझ्या बाबांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि अगदी भारावल्यासारखे ते त्या पांढरी दाढी... खादीचा कुडता... अंगात जाकेट असलेल्या गृहस्थांच्या अगदी पायापाशीच अदबीने बसले. कट्टर सिंह राशीचा स्वभाव असलेल्या माझ्या बाबांना मी येवढं भारावलेलं कधीच पाहिलं नव्हतं. दोघं काहीतरी बोलले आणि ते अचानक उठून दाराकडे चालायला लागले. माझ्या बाबांनी मला हाक मारुन लवकर गाडी काढायला सांगितली. कार्यालयातल्या लोकांनाही कळेना की लग्न सोहळा सोडुन हे प्रमुख अतिथीसम असणारे कुठे निघाले ते. वयानुसार त्यांना भर-भर चालता येत नव्हते. माझे बाबा त्यांना हातात हात धरुन आमच्या घरी घेऊन आले. बघता-बघता आमच्या गल्लीतली वीस-पंचवीस मंडळीही गोळा झाली. माझ्या बाबांनी किल्ल्यांची पेंटींग्ज केली होती ती बघायला उत्सुकतेने ते गृहस्थ आमच्या घरी आले होते हे मला वाटेत कळलं.
माझ्या बाबांना तर आभाळ थिटं झालं होतं. ते घरी आल्यासारखं एखादा फोटो तरी काढुन घ्यावा असं त्यांना वाटलं. दुर्दैवाने तेव्हा मोबाईलमध्ये कॅमेरा नसायचा... डिजिटल कॅमेरासुद्धा नव्हता. आणि आमच्या Kodakच्या कॅमेरामध्ये रोल नव्हता. मला ते लवकर एक रोल घेऊन ये म्हणाले. पण नक्की काय चाललं आहे ह्याचं आजिब्बात गांभीर्य मला नव्हतं. मी आपलं काहीतरी कारण सांगुन बाहेर उन्हात जायचं टाळलं. ते आजोबा आमच्या बारामतीच्या घराच्या वरच्या हॉलमध्ये बसले आणि माझ्या बाबांनी केलेल्या नळदुर्गच्या किल्ल्याच्या पेंटींगकडे बघुन तिथल्या एका नर्तिकेची गोष्ट आम्हाला सांगितली. पंधरा-वीस मिनीटांचीच पण इतकी मस्त की त्या कथेचा एपिसोड अजुन मनामध्ये क्लियर आहे. अगदी तास-दीड तास झाल्यावर ते निघाले. बाबांनी मला त्यांना हाताला धरुन जिन्यावरुन नीट खाली न्यायला सांगितले. माझ्या आजोबांचा होता तसाच मऊ... उबदार... स्निग्ध स्पर्शाचा हात हातात धरुन मी त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडुन आलो. नक्की काय झालय ते मला अजुनही नीट कळलं नव्हतं. ते गेल्यावर बाबा मला म्हणाले... ’अरे तुला कळलं का कोण येऊन गेलं आपल्याकडे...!? बाबासाहेब पुरंदरे...!!... तुला ज्या मोठ्या पुस्तकातली शिवाजी महाराजांची चित्रं आवडतात ना ते पुस्तक ह्यांनी लिहीलं आहे...!!"
दुर्दैवाने तरीही माझ्या डोक्यात फ़ार प्रकाश पडला नव्हता. पण तो माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट होता हे नक्की. लहानपणापासून ज्या जाडजूड पुस्तकातली नुसती चित्र पहात होतो ते ’राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक मी कधी वाचायला लागलो ते माझं मलाही कळलं नाही. एकदा हातात घेतलं की शंभर-दीडशे पानं वाचुनच हातातुन खाली ठेवायचं हे अगदी सहज झालं. अगणित वेळा संपुर्ण वाचून काढलं. महाराष्ट्र... सह्याद्री... पुणे शहर... अगदी आजूबाजुची देवळंसुद्धा बघण्याचा दृष्टीकोन बदलला ते ह्या पुस्तकाने. इतिहासप्रेमाने हे पुस्तक आवडू लागलं की ह्या पुस्तकामुळे इतिहास आवडू लागला...!? गडकिल्ल्यांची भ्रमंती आवड्त असल्याने हे जास्त भावलं की ह्या पुस्तकामुळे गडकिल्ल्यात परत-परत जावं वाटू लागलं...!?
जिथे राहातोय त्या जागेचं नुसतं प्रेम नाही तर अभिमान वाटायला लागला. बारामतीच्या जवळ मोरगाव मंदीरात गेलो की गर्दी न दिसता ’सुखकर्ता-दुखकर्ता’ आरती लिहीणारे समर्थ समोर दिसू लागले. वरंधा घाटातुन जाताना बारीला कान्होजी जेध्यांच्या वाड्याची ओढ लागायची... महाबळेश्वरला आत्तापर्यंत हिलस्टेशन म्हणून गेलो होतो... पण आता रडतोंडींच्या घाटातुन प्रतापगडाचे दर्शन घेतल्याशिवाय पाय मागे फिरेनात. तिथला अफ़जल्ल्याच्या सर्वनाशाचा महापराक्रम आठवू लागला... महाबलेश्वराच्या मंदीरात जिजाऊ आणि सोनोपंत डबीरांची केलेली सुवर्णतुळा दिसू लागली...!! आधी शाळेच्या सहलीबरोबर जाऊन केलेला दौलताबादचा किल्ला आणि सगळा इतिहास डोक्यात भरल्यानंतरचा देवगिरी ह्यात जमिन-आस्मानाचा... नव्हे देव-सुल्तानाचा फरक होता...!! अहो पुण्यात कॉर्पोरेशनजवळून जाताना बसची गर्दी न दिसता... लालमहालात शाहिस्तेखानावर छापा घालण्यासाठी तयारीत असलेली मावळे मंडळी रोकडोबाच्या देवळापाशी दिसू लागली...!!
ह्यापेक्षाही बराच परिणाम खोलवर हे पुस्तक करत होतं. सभोवती चाललेला भ्रष्टाचार थांबवणं किंवा संपवणं अवघड आहे पण आपल्या हातुन एका पैश्याचा गैरव्यवहार होणार नाही हे तरी खात्रीनं सांगतो. सिनेमात अंगविक्षेप करत नाचणार्या नट्या आणि बीचवर उघडं अंग टाकून पडलेल्यांकडे पवित्र नजरेनी बघण्याइतकी विरक्ती अजुन आलेली नाही... पण म्हणुन येता-जाता प्रत्येक बाईला स्कॅन करत बसण्याची लोचट नजर नसेल हे नक्की... सर्वसंग परित्याग करुन समाजसेवा वगैरे जमणार नाही पण माझ्या देशाला कुठेतरी लाज आणेल ही कृतीही घडू देणार नाही.
आपल्या रुटीनमध्ये अगदी चिरपुट का होईना प्रॉब्लेम्स येत असतात आणि आपलं अवसान घालवत असतात. त्या प्रत्येक प्रसंगात मी हा शक्तीग्रंथ हातात घेतो... पाहिजे तिथुन वाचायला सुरुवात करतो. ह्या सगळ्या अतुल पराक्रमापुढे आपले प्रॉब्लेम्स खरोखर किती पोरकट आहेत ह्याची जाणिव होते आणि टेन्शन हलकं होतं. एकप्रकारे व्हिटामीनचं काम हे पुस्तक करत आलेलं आहे. पुलंनी हरितात्यांचं महत्व शेवटी सांगितलंय तसंच... कुठल्यातरी जोमाच्या अदृश्य मनगट्या ह्या पुस्तकानी हातात घातल्यात. मी पर्थला राहायला आलो तेव्हा बरोबर आणले ते कपडे, कॅमेरा आणि ’राजा शिवछत्रपती’...!!
कुणी कितीही राजकारण करो... दंगली करो... पुरस्कार देवो अथवा न देवो... ’राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ आम्हाला शिरोधार्य होता... आहे आणि राहील...!! स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे बाबासाहेबांच्या आणि त्यांच्या फॉलोवर्सच्या वाट्याला ह्या भुक्कड लोकांकडून अवहेलना येणार असेल तर ती सुद्धा मान्य आहे... पण इथुन माघार नाही...!!
प्रणव.

No comments:
Post a Comment