Friday, November 13, 2015

अगदी छोटीशी गोष्ट हो... युवुदुश्शि...!!

मच्या ऋचाच्या शाळेत एखाद्याच्या पेरेंटला बोलावतात आणि दुसर्या देशाची... संस्कृतीची... भाषेची किंवा इतिहासाची माहिती दयायला सांगतात. हा काही शाळेचा उपक्रम नाही. त्या टीचरना धडपड आहे मुलांना जास्तीत जास्त माहिती आणि ज्ञान मिळाव आणि तेसुद्धा हसत-खेळत... मजा करत...!!

वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये डोंगर फार कमी... आहेत ते फार उंच नाहीत आणि आपल्या पुण्यासारखे जवळ नाहीत. त्यात डोंगरावर बांधलेले किल्ले आणि तेही चारशे वर्षापुर्वी...!! सगळ औरच...!!!

माझ्यासमोर असलेली पंचवीस-तीस मुलं आणि तीन-चार टीचर्स ह्यांनी वीस मिनिटांचा गप्पागोष्टींच सेशन खुप इंटरेस्ट दाखवत एंजॉय केल. त्यात शिवाजी महाराज... शिवतीर्थ रायगड... ट्रेकिंग... इतिहास आणि चिल्ल्यापिल्ल्यांशी गप्पा... काय विचारता महाराजा... ह्या माझ्या आवडत्या विषयाचं पंचामृतच...!!

मुलं एकदम एक्साईट झाली होती... डोंगरावर बांधलेले किल्ले बघुन... दगडांच्या कमानी आणि दरवाजे बघुन... अगदी जुन्या काळातले टॉयलेट्स बघुनसुद्धा. रायगडावर असलेली बाजारपेठ... म्हणजेच मार्केट बघताना मी म्हणालो की,'ह्या दुकानातून घोड्यावर बसुनसुद्धा खरेदी करता येईल एवढी उंच होती'... तर एका गोर्या मुलीला 'केएफसी'च्या ड्राइव्ह इनची उपमा सुचली. त्यांच्या डोक्यात कुठेतरी इतिहासातलं चित्र तयार होत असल्याची ती पावती होती.

चलनासाठी काय वापरत होते... कुठली-कुठली दुकानं होती... हे सगळे प्रश्न ते मोठ्या उत्साहात विचारत होते.
जाताना सगळ्या क्लासनी मोठ्ठया आवाजात... एका स्वरात मला 'थॅंक यु' म्हणलं... खर तर मीच त्यांना 'थॅंक यु' म्हणाव इतकी मजा मलाच आली... माझ्या सह्याद्रिच कौतुक करताना... रायगडाचे फ़ोटो दाखवताना... आणि माझ्या राजाचं कौतुक करताना...!!

थॅंक्स अ लॉट माय लिटील फ्रेंड्स...!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...