आज आमच्या बाप्पाला फुलांच्या हाराबरोबर दुर्वा पण मिळाल्या. सईची मैत्रीण घेऊन आली. नेहमीपेक्षा बाप्पा प्रसन्न दिसत होते... आरतीच्या वेळी...!!
सईची गाण्याची वही बर्याच दिवसांनी सापडली. बंदिशी गुणगुणत स्वयपाक अगदी साग्र संगीत झाला. तिचं गाणं ऐकून मी आतल्या खोलीतला तबला बाहेर आणला... जवळ-जवळ महिन्यानी...!!
का रे बदरा... नंदकुँवर की छबी न्यारी... विकल मन... अश्या त्रिताल, एकताल आणि भजनी तालातल्या सोप्या पण सुमधुर बंदिशीवर तिला साथ देणं आणि तिचा आवाज एंजॉय करणं... वा:...!! नंतर आकंठ जेवण... केशर घातलेली शेवयाची खीर...!!
तिकडे बाप्पा प्रसन्न... इकडे मी... दोघांची पोटं तृप्त तट्तटलेली...!!
प्रणव.

No comments:
Post a Comment