नातं नुसतं लग्नाचं किंवा रक्ताचंच असतं असं नाही तर अजून खोलवर काहीतरी अनाकलनीय गुंफण त्यात असते. मी हे म्हणायचं कारण की तारखांची आणि योगायोगांची एक अख्खी मालिका आमच्या घरात आहे.
ज्या दिवशी माझ्या आई-बाबांनी एकमेकांना पहिल्यांदा बघितलं... म्हणजे त्यांचा कांदेपोहे कार्यक्रम झाला... बरोब्बर एक वर्षानंतर त्याच तारखेला माझा जन्म... दोन्हीही १७ एप्रिलच तारीख...!!
त्या काळात लग्न होणं... मुलंबाळं होणं ह्यालाच सेटलमेंट म्हणत. पैसा, कार, घर आणि बाकी गोष्टी होतील आरामात... त्यामुळे कांदेपोहे... एका महिन्याच्या आत लग्न आणि एका वर्षाच्या आत ज्युनियर हजर...!!! जुम्मा... हनुमान जयंती आणि गुड फ्रायडे अश्या सर्वधर्म समभाव असलेल्या त्रिवेणीसंगमावर माझा अवतार ह्या पृथ्वीवर प्रकट झाला.
सोलापूरच्या आमच्या घरी ज्या दिवशी माझं बारसं झालं 'त्याच' दिवशी... अगदी त्याच दिवशी घराच्या मागच्या गल्लीत असलेल्या हॉस्पिटल मध्ये माझ्या बायकोचा जन्म झाला. नवीन दुपट्या-कुंचल्यामध्ये मी पाळण्यात ढाराढुर झोपलेला असताना तिथेच माझी सहधर्मचारिणी हजर...!!
सईची आज्जी जिच्यावर तिचा खूप जीव होता ती आमच्या लग्नाच्या आधी देवाघरी गेली. आशीर्वाद थोडक्यात हुकला. पंढरपुरचा जन्म आणि विठ्ठलभक्त असलेली आज्जी गेली आणि 'आषाढी एकादशी' दिवशीच ऋचा आमच्याकडे आली. हा फक्त योगायोगच असावा का?
ह्याशिवाय छोटे छोटे अनेक योग सारखे येत असतात. माझे बाबा... आई आणि बायको ह्या तिघांचीही जन्मतारीख एकवीसच... महिने वेगवेगळे...!! आमच्या लग्नाचा दिवस तो माझ्या सख्ख्या लहान बहिणीचा वाढदिवस...!! माझ्या पहिल्या फ्लॅटची वास्तुशांत करायला गुरुजींनी मुहूर्त सांगवा तो माझ्या आईच्या वाढदिवसादिवशीच...!?
ह्या तारीख आणि मुहूर्त घटकांच्या आहारी आम्ही कुणी कधीच जात नाही... पण 'तेरा मुझसे है पहेले का नाता कोई... यूँही नहीं दिल लुभाता कोई...!!' हे काम मेंदुचं नाही हृदयाचं आहे... एवढंच...!!
प्रणव.

No comments:
Post a Comment