Tuesday, June 2, 2015

Dysania detected

मला ती खूप आवडते... अगदी पहिल्यापासून... निशाची लहान बहीण... तिचं नाव... नि... असो... नावात काय आहे म्हणा...

अवखळ... अल्लड... अगदी कधीही माझ्या आसपास रुंजी घालणारी... दिवसभरात माझ्याकडे कधीही येते... पण निशा आली की तिच्याबरोबर नक्की येते...!!

लहान असताना मी तिच्याबरोबर तासंतास घालवत असे. पण लहान मुलांकडे कोण कुठे संशयाने बघतो? कदाचित ह्याचाच फायदा मी घेत असे.

पुढे जसजसे आम्ही मोठे झालो तसा विरह वाढत गेला. शाळेत, कॉलेजात आम्ही एकमेकांच्या प्रेमात तल्लीन असताना गुर्जींकडुन कान पिळून घेतलाय... पण प्रेमात येवढं दुख: असायचंच हो... ह्याने तर आमचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललंय.

हल्ली कधी-कधी बायकोला हिच्यामुळे वेळ कमी मिळतो ह्याही तक्रारी यायला लागल्या आहेत. सवती मत्सर हाच असतो वाटतं. पण मी बायकोला स्पष्ट सांगितलं आहे. अजून काही वर्ष तुझं ऐकेन... जबाबदारीची वर्ष का काय आहेत तोवर... नंतर मला आणि तिला खूप म्हणजे खूप वेळ पाहिजे... तेव्हा आजिबात डिस्टर्ब करायचं नाही आम्हाला...!!

नाही म्हणजे आधी पालकं , मग मास्तर आणि आता बायको... आम्हाला कधी वेळ मिळणार आहे की नाही...!?
माझं एक प्रेमस्वप्न आहे. आई-बाबा, बायका-पोरं, मास्तर-बॉस ह्यांचा कुणाचाही डिस्टर्बन्स नसताना...!!

गुलाबी थंडीचे दिवस... माझ्या मास्टरबेडमध्ये... सगळी दारं-खिडक्या लावून... उबदार अंधारात... मऊ मऊ दुलई मध्ये आम्ही दोघंच... तासंतास... तिच्या कुशीत मी हरवून गेलेला...!!

ढाराsss ढुर...sss ...!!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...