बिहारपासून नेपाळपर्यन्त... आणि दिल्लीपासुन पेशावरपर्यंत सगळीकडे भुकंप आणि आता अफगाणिस्तानात भूस्खलनामुळे पन्नास लोकांचा मृत्यू... काय चाललय हे जरा geographical कारण शोधावं म्हणून टेक्टोनिक प्लेट्स, इंडो-ऑस्ट्रेलिया क्रस्ट मुव्हमेण्ट्स वगैरे कधी न बघितलेले विषय वाचता-वाचता झोप कधी लागली ते कळलंच नाही. पहाटे मोठ-मोठ्या आवाजात वाजणार्या सायरनने जाग आली. सगळीकडे हलकल्लोळ चाललेला. तेवढ्यात मित्राचा फोन आला. ताबडतोब टीव्ही चालू कर... नासाच्या सेटेलाईटचे लाईव्ह फुटेज चालू आहे बघ.
माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना. काय चालू आहे ते कळेना. अखंड हिंदुस्थान हिमालयापासून सुटून इंडिअन ओशनवर खाली-खाली सरकत होता. कंधाहार जे आपलं गांधार, जम्मूच्या वर असलेलं 'काशी' हे ठिकाण, अखंड नेपाळच काय... एव्हरेस्ट सकट तिबेट, कैलास आणि मानसरोवर, भुतान, अरुणाचलासकट अख्खा ब्रम्हदेश, अंगकोर घेऊन कंबोडिया, शिवाजी महाराजांना मानणारा व्हिएतनाम घेऊन सुवर्णभूमी असलेला थायलंड... सगळं-सगळं एकत्र खाली सरकत होतं. गणपतीच्या पायाशी असलेला मूषक मुकाट्याने यावा तसा श्रीलंका बरोबर होताच. सगळं अगदी दक्षिण गोलार्धात आलं आणि अथांग सागराच्या मधोमध स्थिरावलं.
एकीकडे मदागास्करसारखा सुस्त देश आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सारखा मित्रदेश. मध्ये अखंड हिंदुस्थान... चारही बाजूनी अथांग सागर. मती गुंगुन जावी तसं ह्या पृष्ठभागी उरल्यासुरल्या सकल जनांनी ठिकठीकाणी जमून भारतमातेसमोर नतमस्तक होत आपलं मांडिलकत्व डोळ्यात आनंदाश्रु साठवत मान्य केलं. जणु हा ईश्वरी संकेतच शिरोधार्य मानला.
त्यांना एक भूमी मिळाली होती. सुख देणारी... शांती देणारी... स्थैर्य देणारी... मनोधर्य देणारी... त्यांच्या इच्छा आकांक्षा जपणारी... चौदा विद्या चौसष्ठ कला पोसणारी... जात-पात विसरून एकाच जगण्याच्या पद्धतीमध्ये एकत्र आणणारी... संस्कृती देणारी... संस्कार देणारी... सुखाचा मोक्ष देणारी...!!
प्रणव.

No comments:
Post a Comment