पर्थमधला दुसराच आठवडा... रात्रीचे दहा वाजून गेलेले. कुणीच ओळखीचे नाही... बरोबरही नाही... पहिल्या पगाराची एकट्यानेच पार्टी करून चालत रुमवर येत होतो. माझं स्टुडिओ अपार्टमेंट होतं ती गल्ली जरा अंधारी... आणि एका मेक्सिकन पबची रेअर एण्ट्री तिथूनच. माझ्यासमोरून आठ-दहा मुलामुलींचा ग्रुप दंगा मस्ती करत पबमधून बाहेर पडला. जोरजोरात हसणं-खिदळणं चालू होतं.
त्यातलंच एक सुक्कट बोंबील माझ्यासमोर आलं आणि काहीतरी सरड्या इंग्रजीत बोललं. सगळे हसले. मी हसल्यासारखं करून बाजूने निघालो. ह्याला अजूनच जोर चढला. पुढे येऊन माझ्यापुढे हातवारे करायला लागला... नाचल्यासारखं करायला लागला. बाकीचे चेष्टामस्करी करतच होते.
बेनं लैच करायला लागल्यावर मी जे भसाड्या आवाजात... मायमराठीमध्ये 'तुझ्यायचा भो...' लै माज आला का ए भा...' म्हणत अंगावर गेलो. (खरंतर आतून घाबरलोही होतो. पुढे काय होईल माहीत नव्हतं. पण आव एकदम असा आणला होता की विचारू नका.) अचानक त्या ग्रुपमधले दोन-तीन हट्टेकट्टे पुढे आले आणि मला आणि त्या सुक्कटला बाजूला करून... 'Take it easy bro ...' म्हणत बाजूला निघून गेले. आणि मी रुमकडे निघालो. अर्ध्या मिनीटाचा प्रसंग.
अशी रस्त्यावर किंवा एकुणच हमरीतुमरी मी दोन किंवा फार तर तीन वेळा केली असेल. मारामारी एकदाही नाही. त्याला कारण कदाचित आमचं टिपिकल साधंसुधं घरातलं वातावरण आणि पांढरपेशी संस्कार असावेत. पण योग्य ठिकाणी रगेल आवाजात भकारार्थी शिव्या निघण्याचं आणि एखाद्याची गचांडी पकडण्याचं कसब दिलं ते 'बारामतीच्या पाण्यानं'... तिथल्या दहा वर्षात... जे तेव्हा नको वाटलं... पण अंगात खोलवर मुरलं. जे असं कधीतरी उपयोगी पडतं... तिच्यायला...!!!
प्रणव.

No comments:
Post a Comment