Tuesday, June 2, 2015

उलघाल

परदेशाचं आकर्षण कुणाला नसतं...!? त्यात आपल्याकडची गर्दी, प्रदूषण, राजकारण, भ्रष्टाचार, सगळीकडे असलेली असुरक्षित भावना आणि सततची बेभरवश्याची टांगती तलवार... ह्यातून सुटका... हवं तर पळपुटेपणा म्हणा... पण बाहेर पडल्यावर सुखासीन आयुष्य पुढे दिसत असतं... मुलांचं सुरक्षित भविष्य दिसत असतं... आणि त्याच वेळेस मनात सल बोचत असते ती आपल्या गावाकडे राहिलेला आपल्या आई-वडिलांची...!!

बरं त्यांना इकडे घेऊन यावं तर त्यांचं मन इथे जास्त काळ रमत नाही. त्यांच्यासाठी सगळं सोडुन परत जावं तर ते म्हणतात की खस्ता खाऊन आम्ही तुम्हाला शिकवलं ते इथेच बसायला नाही...

माझ्यामते आई-वडिलांइतकीच मनाची उलघाल आणि काहीतरी हरवत असल्याची खंत ही परदेशात स्थलांतरित होणार्या पहिल्या पिढीला देखील असावी.

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...