माझ्या लहानपणी बळवंत नाभिक आमच्या घरी यायचा. माझ्या पणजोबांची दाढी आणि कटिंग करायला. एकदा तो आला की माझे आजोबा आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही नातवंडं सगळेच लाईनीत हजामत करून घ्यायचो. आमची हेयरस्टाईल एकच... हातात धरता येणार नाहीत एवढी केसांची लांबी... प्रत्येक केस डोक्याच्या वर्तुळाकार प्रतलाशी काटकोनात सरळ उभा. माझ्या बाबांना मात्र घरातला कर्ता आणि कमाविता म्हणुन ह्यातून सुट होती.
मला एकुणच कटींग करून घ्यायला पहिल्यापासूनच आवडतं. पांघरुण गुंडाळून बसल्यावर बसतो तसं अंगाभोवती कापड गुंडाळलेलं... पाण्याचा बारीक तुषार उडवणारा फवारा... कात्रीचा कटर-कटर आवाज... स्वत:चेच आजूबाजूला पडणारे मऊ केसांचे तुकडे... कटींग झाल्यावर मानेवर फिरवलेला टाल्कम पावडरचा पफ्फ... डोक्याच्या मागच्या भागावर कापलेल्या केसांवर हात फिरवला की ब्रशसारखा येणारा फिल... सगळंच मी मस्त एन्जॉय करत असतो. इकडे आल्यापासून ह्या एन्जॉय मेंट्मध्ये भर पडली ते बळवंतची जागा गोर्यापान चायनीज ललनांनी घेतल्यापासून.
ह्याच आनंदात परवा कटींग करून घ्यायला गेलो. गौरवर्ण सौदर्याने मुखकमल अधिकाधिक फुलवत लडिवाळ प्रश्न केला... 'किती नंबर...!?' ललनेला कात्री नव्हे तर फक्त क्लीपर वापरता येतो आणि त्याचा नंबर ती विचारते आहे हा साक्षात्कार मला जरा उशीराच झाला. 'साईड टु नंबर' येवढं म्हणून मी चष्मा काढला आणि डोळे मिटुन तिच्या मऊ हातांच्या स्पर्शाची वाट बघू लागलो...!!
बाईने राशनपाणी घेऊन जो रंधा मारायला सुरुवात केली... की मला जाग येऊन तिला थांबवेपर्यंत निम्मा नारळ सोलून झाला होता. विशेष कार्यक्रमाला छान हेयरस्टाईल करावी म्हणुन गेलो आणि चम्या होऊन आलो अशी गत झाली.
'बाल' तर गेले... ही 'बाला' एकाचवेळी आकर्षक अन मठ्ठ असे दोन्ही भाव प्रकट करत केविलवाण्या चेहर्याने माझ्याकडे पाहात असताना राग तरी किती दाखवणार...!? आता अर्ध्या डोक्याने मिलीटरी जवान आणि अर्ध्या डोक्याने नवकवी असे काही आठवडे घालवावे लागतील येवढंच काय ते...!!
प्रणव.

No comments:
Post a Comment