आठवड्याच्या मध्येच होळीपोर्णिमा आल्याने पुरणाचा गोळा नैवेद्यानंतर फ्रिजमध्ये गेला तो आज विकेंडलाच बाहेर आला. आज जेवणाचा बेत म्हणजे काय विचारता प्रभो... पुरणाची पोळी, कटाची आमटी, बटाटा फ्लॊवरची भाजी, गाजराची खिसून कोशिंबीर, दाण्याची चटणी आणि तळलेला पापड...!! मी आणि ऋचा डायनिंग टेबलवर जेवायला बसलो होतो आणि सई तिकडून गरमा-गरम पोळ्या करुन आम्हाला वाढत होती. सईचं अगदी माझ्या आईसारखं आहे. ह्या दोघी स्वयपाक करुन वाढत असताना जेवणार्याने बकासूर कथेतल्या भीमासारखं अगदी गाडाभर जेवण करावं असं त्यांना वाटत असतं. ’अरे येवढं केलंय तर पोटभर जेवावं माणसानं..’ हे वाक्य मी लहानपणापासून ऐकत आलोय ते अगदी म्हातारपणापर्यंत ऐकेन असं वाटतंय.
बरं गोड काहीही खायला मला आग्रह लागत नाही हे दोघींनाही चांगलं माहित आहे. निदान पुरणाच्या पोळीला तरी मी स्वत:च्या घरी लाजणार नाही हे नक्की. मी आपली पडत्या फळाची आणि तिच्या वाढत्या आग्रहाची गुणोत्तरीत सुवर्णसंधी, तुपाचं तांमलं पुरणपोळीवर उपडं करत साधत होतो. तुपानं थपथपलेली गरम-गरम पुरणाची कितवी पोळी चालली होती देव जाणे... ऋचा माझ्याकडे बघून म्हणतेय... ’किती पोळ्या बसतात रे बाबू तुझ्या पोटात... गणपती बाप्पासारख्या...!!’
आजकालची मुलं सांगतो तुम्हाला... छ्या:... काही सोयच राहिली नाहीये. जाऊ दे म्हणत मी भाताचं भांडं समोर घेतलं.
प्रणव.

No comments:
Post a Comment