Tuesday, June 2, 2015

भिन्न षड्ज

कामात मग्न होतो... मुड चांगला असला की आपोआप कुठल्या तरी गाण्याची गुणगुण सुरु होते. डोक्यात बसलेली एक छान ओळ आणि तान अचानक आठवते. ते गाणं पुर्ण ऐकायची तहान लागते.

नेमकं ह्या वेळेस आठवत नाही की हे मध नक्की कुठल्या फुलातून उचललं होतं. असंच काहीसं झालं होतं... अश्विनी भिडे-देशपांडेंचा आवाज मनात आणि डोक्यात घुमू लागला. पण कुठल्या रागातली चीज हे कळेना.

जवळ असलेले तीस-पस्तीस राग धुंडाळून... त्यांचे विलंबित, मध्य आणि दृत लयीतले शब्द बघून झाले. अश्या वेळी नुसत्या स्वरांवरून राग ओळखणं जमत नसल्याची चीड-चीड होतेच होते. पण हार न मानता शोध चालूच ठेवला. तहानच तेवढी आतून लागली होती.

गुगल एरवी एवढी फालतू माहिती चुटकीसरशी देतं... आज त्याला पण सापडेना. शब्दावरून नाही... गायिकेवरुन नाही... राग माहीतच नाही. नुसत्या त्रितालातल्या दृतवरून काय सापडावं गुगलवर तरी...!!

सापडला... राग सापडला... राग 'भिन्न षड्ज'... 'जा रे जा रे जा जा कगवा...!!' हीच चीज... अश्विनी भिडे-देशपांडेंचा मंत्रमुग्ध करणारा आवाज. कालपासून सत्तर वेळा ऐकून झालं आहे... अजून दोन-अडीचशे वेळा ऐकलं की जरा तहान तात्पुरती भागेलसं वाटतंय.

प्रणव.

Raga Bhinna Shadaj 2 - Ashwini Deshpande: http://youtu.be/LXrBE-x-b2A

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...