Saturday, January 24, 2015

माझ्यातला डार्विन - भाग २

बुद्धी मिळाली. प्राण्यांपेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत ही जाणीव हळू-हळु होऊ लागली. जगण्यातल्या त्रुटी जाणवू लागल्या... कष्ट जाणवू लागले. गरजा वाढू लागल्या. गरजातून शोध लावण्याचा खटाटोप सुरु झाला. दगडाची अवजारं तयार झाली. जीवसृष्टीचा शून्यप्रवास संपून कालमापन सुरु झालं.

काही मानवांनी ज्या परग्रहींनी कृपा केली त्यांचे काही संदर्भ नोंदवून ठेवले. ते दोघे... कुणी म्हणे शिव आणि विष्णू... त्यांचा उगम माहित नाही... नक्की स्थान ज्ञात नाही...!! बुद्धी दिली तो दिवस... म्हणजेच ज्ञान वृक्षाचे फळ खाल्ले आणि जाणिवा जाग्या झाल्या तो दिवस नोंदवला. खुणा तयार झाल्या गुहेतल्या चित्रांमध्ये... भुर्जपत्रातल्या श्लोकांमध्ये... दगडांच्या लेण्यामध्ये... नाझकाच्या रेखांमध्ये... Pyramids च्या अद्भुत बांधकामामध्ये...!!

विधात्याने सांगूनच ठेवलं होतं... संकट आलं की धावा कर... धावत येईन तुझ्यासाठी. मग कुणी यज्ञ करून आराधना करी... तर कुणी जप-तप करून. कुणी आर्क बनवून डोंगरावर जाई... जन्मदात्याशी संवाद करी अन 'टेन कमाण्ड्मेण्ट्स' घेऊन येई... तर कुणी हिमपर्वतांवर शोध घेई. मार्ग वेगवेगळे... साधनं वेगळी... साध्य तेच...!!

कल्पनाविस्तार. क्रमश:

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...