सूर्यासारखा तप्त लाव्हा असलेला पृथ्वीगोल कालांतराने थंड झाला. पूरक परिस्थिती आणि पोषक वातावरण मिळाल्याने अमिबापासून जीवसृष्टीला सुरुवात झाली. काही टिकले... काही वाढले... काही वातावरणाला अनुकूल बदलले. असंख्य जीवप्रकारात मानवसुद्धा एक...!!
काहीसा दुर्बलच ... ना तीक्ष्ण नखं... ना घट्ट सुळे... ना आकाशात उडता येत... ना पाण्यात पोहता येत...!! पाठीवर ना कवच कुंडल... ना डोक्यावर शिंगं... ना पायाला खुरं...!! काहीच नाही. ना गवत खाऊन जगू शकतो... ना मेलेल्याच मास खाऊन...!! पाऊस, वारा, ऊन अन थंडी... सगळ्यापुढेच हतबल...!!!
कसातरी जगत होता. तग धरायचा प्रयत्न बाकी जीवांबरोबर करत होता. अगदी तसाच जसे बाकी सजीव. 'आहार-निद्रा-भय-मैथुन' ह्याच्या पलिकडे काही नाही. अशी अगणित वर्ष गेली. जातच होती...!!
एकदा एक परग्रहाचं यान ह्या उर्वीजवळुन गेलं. काय गंमत आहे हे पहायला खाली उतरलं. यानातून दोन महाकाय परग्रही बाहेर आले. आजूबाजूचे प्राणि ते बघू लागले. चाणाक्ष नजरेला अन कुशाग्र बुद्धीला हा दुर्बल जीव ओळखणं काही अवघड काम नव्हतं. दोघांचं ठरलं. ह्याच्या जडणघडणीत एक छोटासा बदल करायचा. ह्याला काही उपयोग होतो का बघायचं. एक प्रयोग करायचा. थोड्या-थोड्या कालांतरानी येथे येऊन सगळं नीट असल्याची खात्री करायची. बास ठरलं. ह्या दुर्बल प्राण्याला एक अंश त्या महाबलाढ्य परग्रह्यांनी दान दिला... बुद्धी...!!!
ज्याच्याकडे बाकी काहीच नाही त्याला बाकीच्यांकडे आजिबात नाही तेच मिळालं. आणि तयार झाला माणुस...!!
कल्पनाविस्तार. क्रमश:
प्रणव.

No comments:
Post a Comment