आज इथलं सर्वात जुनं... म्हणजे अगदी पुरातन प्रिझन... म्हणजे जेल बघायला गेलो होतो. अगदी १९९४ पर्यंत तिथे कैदी होते म्हणे... इतकं...sss ... पुरातन... (च्यायला... आमच्या पुण्यात भाजीवाल्याच्या बुडाखाली दोन-अडीचशे वर्षापुर्वीच्या इमारतीचा दगड सहज सापडतो. त्याची दखलही कुणी घेत नाही.)
अगदी लास्ट मिनीट ठरलं म्हणुन घरी तयार असलेलं जेवण pack करून घेऊन गेलो. दोन टुर्सच्या मध्ये जेवणाचा ब्रेक घेऊन त्या जेलच्या आवारातच इडली-साभांरवर ताव मारला. तसं जेलमधलं माझं पहिलंच जेवण...!!
लंचनंतर फलाहार म्हणून केळी होती. ऋचा म्हणाली... मला नको हे 'बनाना'... खूप काळं झालंय. आता मुलाना काहीतरी कारण पाहिजेच असतं खाणं टाळायला. पण त्यावर लगेच आमची सौ... 'काही होत नाही... जेलमध्ये हे असंच मिळतं खायला...!!' माझ्यासकट ऋचा... आणिक आजूबाजूचे दोन-चार टुरिस्ट सुधीर-बधीर... शुद्ध येईपर्यंत बनाना फिनीश...!!
मुलांना चिकाटीने खायला घालताना भारतीय माता ही जेम्स बॉंड पेक्षा स्मार्ट होत असते हेच खरं...!!
प्रणव.

No comments:
Post a Comment