Thursday, December 11, 2014

भावनाशुन्य

दिलीप कुमार उर्फ मुहम्मद युसुफ खान ह्यांच्या निधनाची अफवा कालपासून सगळीकडे आहे. मी मनापासून त्यांचं वाईट चिंतत नाहीये आणि चांगलं तर त्याहून नाही. मला ह्या माणसाविषयी काही भावनाच नाहीयेत. उद्या उठून अफवा सत्यात परिवर्तित झाली तरी... आणि अजून पन्नास वर्ष काही बातमीच आली नाही तरी... मला काहीच फरक पडणार नाहीये.

आता दोन मुलभुत प्रश्न मला विचारले जातील.

प्रश्न एक: तुला कुणी विचारलाय का?
त्यांना माझा प्रतिप्रश्न असेल: तुम्हाला मी सांगितलय का?

प्रश्न दोन: त्यांचे एवढे चाहते आहेत आणि तुला काहीही भावना नाहीत?
उत्तर: कोट्यावधी चाहते तर शाहरुखला सुद्धा आहेत. मला त्याच्याविषयी पण काहीही भावना नाहीत.

मग हा उटारेटा कशाला...!? सांगतो...

न जाणो उद्या उठून काही बातमी आलीच तर उठसुठ गळे काढणार्या... केवळ निजधामाला बदली झाली म्हणून देवत्व देणार्या... तळपत्या सुर्याचा अथवा युगपर्वाचा अस्त वगैरे बातम्या छापणार्या... आणि स्वत:ला ह्यांचा fan म्हणजेच अभिनयाचा जाणकार म्हणवून घेणार्या सगळ्यांनाच माझा advance मेसेज...

I am NOT with you ... Sorry ...!!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...