Thursday, December 11, 2014

काय सांगता...!!?

भारतीय माणूस एकदा का इतिहास आणि संस्कृतीबद्दल बोलायला लागला की कुणालाच आवरत नाही. त्यात तुम्ही भारताच्या बाहेर असलात की ह्या गोष्टीला अजूनच ऊत येतो.

असाच एक प्रसंग... स्थळ अर्थातच सांस्कृतिक कार्यक्रम. बोलणारी मंडळी सांस्कृतिक गणवेश... अर्थातच कुर्ता-पायजमात. काही वेळापूर्वीच भगवतगीतेचं जोरदार प्रवचन झोपेत अर्धवट ऐकलेलं. त्यावर ढेरकं भरुन अगदी आग्रह करकरून चापलेलं खीरीचं जेवण. चर्चेचा विषय हिंदू धर्माची जागतिक व्याप्ती...

एक गृहस्थ : पुर्वी हा एकच धर्म पृथ्वीतलावर होता. बाकी सगळे जंगली आणि आदिवासी होते.
(ह्म्म्म... गुलाबजाम छान झालेत. अजून एक वाटी...ss...!!)

दुसरे सज्जन : महाभारत काळात आणि त्यानंतरही हिंदू राजांनी देवांचा आणि मंदिरांचा प्रसार अगदी इंडोनेशिया, कंबोडिया पर्यंत केला होता.
(खोरोय त्युमौचौ ओगादी... अम्म्म... च्योम्म-त्योम्म...!!)

तिसरे सज्जन: फक्त तिथेच नाही... अगदी ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा पोचले होते आपले पांडव.
(माझ्या हातातली पाचवी गुलाबजामची वाटी टेबलावर... एक आवंढा.)

पुन्हा हेच सज्जन: अहो 'पर्थ' आहे ना आपलं... ते आधी 'पार्थ' होतं... पार्थ म्हणजे अर्जुन... तो त्याची शस्त्र ठेवायचा इथं... त्यामुळे पडलं हे नाव.
(माझं लक्ष दारात चप्पल कुठे काढून ठेवली आहे इकडे.)

ह्याच महाशयांचा निकराचा गौप्यस्फोट: अहो इथेच नाही अमेरिकेतही पांडव पोचले होते. 'अर्जुना'च अपभ्रंश होऊन झालं Arizona...!!!

जमावाची पांगापांग... माझा सभात्याग ...!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...