Thursday, December 11, 2014

मी अन माझं डोस्कं

बारामतीला असताना आमच्याकडे धुणं-भांडी करणार्या एक आज्जीबाई होत्या. अगदी पासष्ठीच्या पुढच्या, पाठीत वाकलेल्या, दाताचं बोळकं आणि मोतीबिन्दुतुन वाचलेल्या एकाच डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा लावणार्या...!!

माझं दहावीचं वर्ष... अभ्यासाचं अगदी टिपिकल वातावरण त्या वर्षभर पाहात होत्या. दहावी पास झाल्यावर पेढा देऊन मी त्यांच्या पण पाया पडलो होतो. म्हातारीने बोळकं भरून आशीर्वाद दिला होता.

पुढे दहावीनंतर मी इंजिनियरिंग डिप्लोमाला एडमिशन घ्यायचं ठरवलं. काही कारणाने एडमिशन प्रोसेस लांबली. माझे मित्र अकरावी सायन्स, कॉमर्स कॉलेजेस मध्ये जायलासुद्धा लागले. मी दोन महिने घरीच...!!

इकडे आज्जीबाईनी मोठ्या कौतुकानी माझ्या आईकडे चौकशी केली... 'प्वोराला अकरावीला न्हाई घातला का...!?' आई म्हणाली,"अकरावीला नाही गेला... डिप्लोमा करणार आहे."

'पदरी पडलं अन पवित्र झालं' अशी भावमुद्र करत आज्जीबाई फरशी पुसत म्हणाल्या... "जाऊ दे ताई... दाहावी झाला लई झालं... फुडं जाऊन घरचा कामधन्दाच बघणार हाय न्हवं... न्हाई तर न्हाई गेला अकरावीला... डोस्कच चालत नसेल तर काय करनार ...!?"

तुम्हाला सांगतो... हे तेव्हापासून आहे...!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...