जीममध्ये वजनं उचलून स्नायू जेवढे ताणले जातील तेवढी शरीरावरची अनावश्यक चरबी झडून जाते. रक्ताभिसरण वेगाने होते... शरीर जास्त active होते... त्याची कार्यक्षमता वाढवते. पण हा ताण बंद होताच ढेपाळते... सुखाधीन होते... सुस्त होते... रोगट होते...!!
शरीराचं आहे तसंच मनाचं आहे. ह्यावर संकटांचा जेवढा ताण येईल तेवढी अनावश्यक बुरसट विचारांची चरबी झडून जाईल... त्यातून बाहेर पडण्याचे उपाय शोधण्यात कार्यान्वित होईल... active होईल...!! हा ताण जाताच सुस्त होते... लक्ष्यापासून विचलित होते... विनाकारण आकसते...!!
भावनाशुन्य आणि बोथट मन हे प्रॉब्लेम्स नसल्याचं प्रमुख लक्षण आहे. माणसं संकटात जवळ येतात ही ह्याच नाण्याची दुसरी आणि जमेची बाजू...!!
झाडांना घालायचं खत जसं कुजकट, दुर्गंधीयुक्त आणि कुरूप तसेच हे प्रॉब्लेम्स सुद्धा ... दोन्हीचा उपयोग एकच... त्याला पार मुळापाशी गाडून टाकून त्यातून पोषक तेवढं शोषून घ्यायचं आणि नित्यनवीन फुल फुलवायचं...!!!
प्रणव.

No comments:
Post a Comment