Thursday, December 11, 2014

मी आणि मोदी

रेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौर्यावर आले तर जो तो मला विचारतोय... काय भेटायला जाणार नाही का...!? मी त्यांचा समर्थक आहे हे सकल जनांस माहित असले तरी ते काही माझे दूरचे मामा वगैरे लागत नाहीत की मी अगदी आवर्जून भेटायला जायला.

आणि ते काय भाच्चीला भेटायला आलेले शेजारचे देशपांडे काका आहेत का की तुमचा पण दिवाळीचा राहिलेला फराळ, शेकायची गरम पाण्याची रबरी पिशवी आणि कानटोपी घेऊन आलेत पुण्याहून तेवढी घेऊन जा... तेवढीच भेट होईल म्हणायला...!!

खरी मजा तर पुढेच आहे. आमच्या ऑफिसमध्ये एक गोरी-गोरी, निळ्या डोळ्यांची बार्बी डॉल आहे... ती बोलायला लागली सगळे नुसते आ वासून तिच्या तोंडाकडे बघत असतात.

कधी नव्हे ते ती माझ्या डेस्कजवळ आली आणि मला म्हणाली,"तुला नाही का कार रेस आवडत? कुणीतरी मोडी नावाचा इंडियन प्लेयर आहे ना? ते G-20 का काय ते कार रेसिंगच आहे ना? नावावरूनच कळतयं की...!!"

आज मी त्या मठ्ठ सौंदर्या कडे आ वासून बघत होतो...!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...