दिनांक ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र मंडळ पर्थतर्फे आम्हाला दोघांना रेडिओवर प्रोग्राम सादर करण्याची संधी मिळाली. सईचा आवाज मुळातच गोड... expressive आणि त्यात तिला आधीच्या एका रेडिओ प्रोग्रामचा अनुभव... त्यामुळे अगदी मस्त झाला... मी मात्र अगदी हवामान खात्याचा रिपोर्ट दिल्यासारखे संवाद बोलत होतो अशी एक-दोन मतं मिळाली. असो. जेणे काम तेणे जाणे... माझ्या लिखाणाला मात्र भरभरुन प्रतिसाद मिळाला. ह्याचसाठी हा अट्टाहास... आपल्याकडे आहे ते विकावं म्हणतात माणसानं... आहे तसं स्क्रिप्ट पोस्टतोय... कारण... ’हे आपलं असंच...!!’
95.3FM रेडिओ संगम ह्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र मंडळ पर्थतर्फे मी सई जतकर आपले स्वागत करते... आणि माझ्याबरोबर... अरे काय रे प्रणव... इथेसुद्धा तु फोनवर बिझी...!?
अगं Sorry... केळकरांचा whatsapp वर मेसेज आला होता... आपल्याला कार्यक्रमासाठी All the best देण्यासाठी... त्यांना रिप्लाय करत होतो...
ओके... ओके... मला वाटलं की नेहमीसारखा तु आपला whatsapp वर मित्रांचे मेसेजेस वाचण्यात दंग... झालं का मग आता...!? करायची का सुरुवात कार्यक्रमाला...!?
हो... हो... नक्की... नमस्कार मंडळी... मी प्रणव जतकर पण आपले स्वागत करतो... काय मग कसं काय चाललय...!?
अरे हे काय...!? कार्यक्रम सादर करायचाय ना...!? काय कसं काय काय...!?
मग...!? कार्यक्रम सादर वगैरे काय करायचाय...!? गप्पा मारु ना मस्त... हाय काय अन नाय काय...
म्हणजे...!? आता हे काय आणि नविन...
म्हणजे रेडिओवर अगदी घिसे-पिटे कार्यक्रमच आले पाहिजेत असा काय नियम आहे काय..!? नाटकी कोरीव हसणं... गाण्याचे गायक-गीतकार-संगीतकार सांगायचे आणि लोकं बोअर होऊन अगदी रेडिओ बंदच करायला उठली की मग मध्ये-मध्ये गाणी ऐकवायची... असं चाकोरीबद्धच झालं पाहिजे का सगळं...!?
बरं मग काय आता नविन आयडीया आहे तुझ्या सुपिक डोक्यात...!?
माझ्या सुपिक डोक्यात अशी आयडिया आहे... की हेच सुपिक डोकं आणि त्यातुन आलेलं हे स्क्रिप्ट बाजुला ठेवायचं आणि ह्या कार्यक्रमाच्या निमीत्ताने मनमोकळ्या गप्पा मारायच्या...!!
अरे पण आपल्या नुसत्या गप्पा ऐकण्यामध्ये बाकी कुणाला कशाला इंटरेस्ट असेल...!? लोकांना आवडेल... रुचेल... आणि मनोरंजन होईल असं काहीतरी पाहिजे ना... एकदम खास काहीतरी...!
हो मान्य... एकदम मान्य... पण लोकांना रुचायला... आवडायला प्रत्येकवेळी काहीतरी खासच लागतं हे तुला कोण म्हणलं...!?
नक्की काय म्हणायचय तुला...!?
पुल देशपांडे हे आपल्या प्रत्येक मराठी दैवत... बरोबर...!?
बरोबर...
त्यांनी केलेलं विनोदी लेखन येवढं लोकप्रिय होण्याचं कारण काय माहितीये तुला...!?
काय...!?
त्यांच्या विनोदी लेखांमध्ये सर्वसामान्य माणसाच्या daily रुटीनमधलचं वर्णन आहे. एक common family man रोज फेस करत असलेले प्रोब्लेम्सच त्यांनी विनोदी ढंगात सांगितले. एकदा तुझा आणि माझा प्रोब्लेम एकच आहे म्हणलं की लगेच मैत्री होते ना तसं. आणि हे मुख्य कारण आहे ते येवढे लोकप्रिय होण्यामागे. ह्याचप्रमाणे आपल्या निखळ गप्पा लोकांचं नक्की मनोरंजन करतील... खात्री आहे माझी... ह्या कोरीव आर्टीफिशीयल स्क्रीप्टपेक्षा तर नक्की इंटरेस्टींग वाटेल...!!
बरोबर आहे... पण नुसत्या गप्पा नको बरं का... आपला हा कार्यक्रम गाण्याचासुद्धा आहे बरं का राजे...!!
हो... हे मात्र अगदी खरं...! बोल मग कुठलं गाणं ऐकायचय ते... तु नुसतं बोल गं... आज मुड जाम भारी आहे आपला... लगेच ऐकवतो बघ...!!
अगं बाई अरेच्चा पिक्चरमधलं आहे ना... मन उधाण वार्याचे... ते...
एक नंबर... मला पण फार आवडतं ते... ऐक तर मग...!!
______________________________________________________________________________
काय मस्त गाणं होतं ना... मला फार आवडतं हे गाणं... आणि माझी खात्री आहे की आपला कार्यक्रम ऐकणार्यांनासुद्धा नक्की आवडलं असेल. बरं मग आता गप्पा मारायच्या तर विषय नक्की केला पाहिजे ना...!?
विषय...!? गप्पांना कधी विषय असतो काय...!?
काय...!? काही विषय नाही...!?
आजिबात नाही... विषय ठरवुन करतात ना त्याला चर्चा म्हणतात... गप्पा नाही...!! खरा मनापासून संवाद हा गप्पांमध्ये साधला जातो... चर्चेतुन नाही... चर्चा द्न्यानसंपादन वगैरे करुन देत असतील पण त्याने ती मजा येत नाही नक्की...!! चर्चा वर-वर अगदी कोरड्या ठणठणीत असतात...!!
हे बाकी अगदी खरंय हा... नायतर नुसत्या कोरड्या चर्चा आपण कितीतरी ऐकतो... कुणाचं कुणाला काही घेणं-देणं नाहीये हे अगदी जाणवत असतं... सगळे मिळून कुठल्यातरी अगदी सिरीयस विषयात अगदी बाल की खाल काढत बसलेले असतात...!!
नायतर काय... गप्पा अश्या चौकटी बाहेर अवांतर गप्पांमधुनच रंगल्या पाहिजेत.
तासनतास गप्पा झाल्यानंतरसुद्धा आपण नक्की कुठल्या विषयावर बोललो हे पटकन समराईज न करता येणं हे चौफेर गप्पांचं खरं लक्षण आहे... एकदा का रंगीबेरंगी म्हणलं की एकच कुठला रंग सांगता येऊ नये ना तसं...!!
पण खरं सांगु का प्रणव... हाच मनांचा संवाद हल्ली कमी होत चालला्य... प्रत्येक जण स्वत:च्याच रुटीनमध्ये बिझी आहे. मित्र-नातेवाईक भेटणं बोलणं बंद झालय हे तर आधी होतंच पण आज-काल घरातला संवादसुद्धा विरळ आणि तुटक होत चाललाय. job, करियर, पैसा, कार... घर... ह्या जगण्याच्या शर्यतीत जगणंच विसरुन गेलोय रे आपण... प्रेमाचे दोन शब्दच बोलणं विसरुन गेलोय...!! प्रत्येक जण आपल्या आणि दुसर्याच्या future comfort साठी present मात्र miss करतोय...!!
एकदम परफेक्ट बोललीस बघ... पण तुला सांगू... काय चुकतय हे लक्षात येणं ही चूक सुधारायची पहिली पायरी आहे. निसर्ग आणि ह्याच जगण्याचं मस्त नातं सांगणारं हे पुढचं गाणं ऐक... फुलावर पाणी शिंपडल्यावर त्याला टवटवी येते ना... तसं हे गाणं ऐकून होतं की नाही बघ... एकदम टकटकीत...!!!
___________________________________________________________________
सई, हे गाणं ऐकून ना मला आपलं कोकण आठवलं... कौलारु टुमदार बैठी घरं... घरासमोर झाडं.. फुलं... कसं मस्त निसर्गरम्य असं... मी जेव्हा आपल्या पुण्याच्या कॊंक्रीटच्या उंच-उंच बिल्डींगच्या जंगलातुन इथं पर्थला आलो ना तेव्हा इथली घरं बघून अश्या गावातल्या घरांचीच आठवण यायची.
खरच फ्रेश वाटलं ह्या गाण्यानी. हा मनाचा फ्रेशनेस जर परमनंट राहिला असता तर किती बरं झालं असतं ना... काही दु:ख नाहीत... टेन्शन्स नाहीत... कटकटी नाहीत... भांडणं नाहीत... कायम अगदी... आल इज वेल पाहिजे... हो ना...!?
कायम आल इज वेल राहावं हे प्रत्येकालाच वाटतं गं... ती धडपड कायमच चालू असते... But some things are part & parcel of life... काही गोष्टी माहित असुन आणि नको असुन सुद्धा accept कराव्या लागतात... जसं Policy Investments च्या बारीक टाईपातल्या terms & conditions read carefully सांगून सुद्धा कुठे वाचतो आपण... पण ’I Accept’ वर क्लिक करावच लागतं...!! तसंच आहे हे.
इन शोर्ट... हे टाळता येत नाही...
नाही...
पण मग ह्यावर सोल्युशन काय...!?
आहे त्या परिस्थितीतुन सुखाचे क्षण शोधायचे... एकमेकांशी सुख-दु:खाचा संवाद साधायचा... एकमेकांना वेळ द्यायचा...!! त्यासाठी TV, mobile, tab, laptop हे gazzets आधी बाजुला ठेवायचे... तु observe केलं असशील की फक्त टिव्ही नामक idiot box कमी केल्याने आपला आधीपेक्षा किती वेळ वाचतो ते.
हो ना... देवानं ऐकलं माझं... आता तुझं ते whatsapp आणि फेसबुक कमी झालं की राहिलेले नवसपण फेडुन टाकीन रे देवा..!!
म्हणजे...!? मी काय येवढा फोनमध्ये डोकं घालून बसलेला असतो काय की तु अगदी देवाला नवस वगैरे करतेयस...!?
नाहीतर काय...!? तु ओफिसमधुन आल्यावर मी तुला अगदी उत्साहात दिवसभराचं काहीतरी सांगत असते आणि तुझं डोकं आपलं त्या whatsapp मध्ये... काय म्हणलं सांग आत्ता तर सांगता येतं का तुला...!?
माफ कर रे देवा... पुर्वी तुला लोकांचे परिक्षा-लग्न-मुलं-बाळं... फार-फार तर lottery चं तिकीट हे असले problems solve करायला लागायचे... आता तुझ्या नवसाच्या डिलमध्ये काय-काय terms & conditions येतील ते तुच carefully read करत जा म्हणजे झालं...!!
ते देवाचं देवाला बघू देत... तुम्ही तुमचं बघा...!!
अरे अरे... काय हे माझे हाल... घरी आलो की बायकोची बॊसगिरी... आणि ऒफिसला गेलो की बॊसची बायकोगिरी...
आं... काय...!?
नाही... आय मिन... जिथे-तिथे बॊसिंग करणारं कुणीतरी आहेच असं म्हणायचं होतं गं मला...!!
कळलं... कळलं... गप्पा नंतर मारु... आधी हे मस्त गाणं ऐक आता...!!
_________________________________________________________________________
गाणं छानच होतं... पण आता जरा मगाशी आपण काय म्हणत होता ते सांगा जरा madam...!!
काय... कुठे काय...!? मला नाही आठवत...
पण मला आठवतय ना... मी सांगतो... मी जसा whatsapp आणि फेसबुक मध्ये डोकं घालून बसतो म्हणतेस ना तशी तु सुद्धा त्या दैनंदिन साबणात डोकं घालून बसलेली असतेस...
दैनंदिन साबण...!?
हो... हो... दैनंदिन साबण...!! म्हणजे तुझ्या त्या डेली सोप्स...!! मराठी पिडूक सिरीयल्स...!! स्वयपाक करताना ओट्यावर... डायनिंग टेबलवर... सोफ्यावर... अगदी झोपताना बेडवरसुद्धा... tabच्या batteryच्या तोंडाला फेस येतो पण त्या सोपचा फेस काही संपत नाही...!!
खरंय... कधी कधी जाणवतं मला कि आपण ह्या सिरीयल्स अन टुकार पिक्चर बघण्यात किती अमुल्य वेळ वाया घालवतोय...! टिव्हीचे शंभर channels सर्फिंग करण्यातच सगळा वेळ निघून जातो आणि दोन तासांनंतर काहीच बघितल्याचे समाधानही मिळत नाही.
तुला आठवतय... गणपती कार्यक्रमासाठी आपण अष्टविनायक पेंटींग्ज केले होते... पेंटींग्ज किती छान झाले आणि लोकांना किती आवडले ह्यापेक्षा आपण ते करताना किती ऎन्जोय केलं...!! रोजच्या कटकटी... job मधले टेन्शन्स... पैशाच्या बेरीज-वजाबाक्या... सगळं-सगळं विसरुन तेवढा वेळ जे मनाला आवडेल ते केल्याचं समाधान शब्दात नाही सांगता येणार...!
पैसा सगळं समाधान देऊ शकत नाही हे अंशत: तरी खरं आहे बरं का...!
अंशत: का...!? शंभर टक्के का नाही...!?
हाहा... कारण फक्त आदर्शवादाने पोट भरत नाही सईबाई... बेसिक कंफर्ट साठी थोडा पैसा हा लागतोच... पैशाने सगळी नाही म्हणली तरी काही काही सुखं नक्की विकत घेता येतात बरं का...!!!
नही नही... बिलकुल नही... दो चुटकी सिंदुर की किमत तुम क्या जानो प्रणव बाबू...!?
आता हे काय नविन...!?
हा हा.. काही नाही रे... असंच... काहीतरी बोलून तुझी लिंक तोडायची होती मला...!!
कसली आहेस अगं... कधी नव्हे ते माझे मौल्यवान विचार प्रकट करत होतो आणि दो चुटकी सिंदूर का काय मध्ये आणलास...!!
अरे नायतर काय... एक छान गाणं ऐकायचं होतं म्हणून... चल आता मी तुझ्या आवडीचं गाणं लावते... बघ... आणि सांग मला...
बघ...!? अगं हा रेडिओ आहे... बघ काय...!?
लगेच शब्दात पकडू नकोस रे... बघ म्हणजे... बघ तुला आवडतयं का ते...!!
__________________________________________________________________________
हा कार्यक्रम आपल्याला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाचे मी आपल्या दोघांतर्फे आभार मानतो.
हाश... गुड... महत्वाची जबाबदारी पार पडली. बर मला सांग... आपण गेला अर्धा तास बडबड करतोय... छान छान गाणी ऐकतोय आणि ऐकवतोय... वेळ कसा गेला कळलं तरी का...!? एकदा घड्याळाकडे बघ एकदा सई...! आपल्याला दिलेली वेळ संपत आली आहे आता...!!
हो ना रे... खरच किती मस्त वाटलं अश्या नुसत्या गप्पा मारायला... ह्या प्रोग्रामच्या निमीत्ताने आपल्यालासुद्धा रिफ़्रेश होता आलं... आणि माझी खात्री आहे की हा प्रोग्राम ऐकणार्या आपल्या मित्र-मैत्रीणींनासुद्धा छान वाटलं असेल...!! आपल्यासारख्या गप्पा माराव्यात असं वाटत असेल... अगदी स्पेशल मोकळा वेळ काढून...!!
येस... आणि म्हणुनच हा कार्यक्रम ऐकणार्या सगळ्या फ़्रेंड्सना आपल्याकडून कवितेतुन हा स्पेशल मेसेज...
तु केली आहेस ही कविता का आणली कुणाची ढापुन...!?
हाहाहा.. अर्थातच मी केली आहे... वाड्मयचौर्य आपल्या रक्तात नाही बरं का... तोडकं -मोडकं का होईना पण फक्त स्वत:चा माल विकतो आपण... आता जरा ऐका...
जीवनाचे शल्य येथे... का कुठे चुकते कुणा
मात त्यावर तुच करी ही... व्यर्थ तुज भीती कशा
रंग हे तुज बोलविती... रंग हे तुज बोलविती...
गंध हे तुज जोजविती...
शिंपता मधुरस निषदिनी... मन कधी ना कोमेजती...
साधुनी संवाद घ्यावा... प्रेमवेडा जीव हा...
भावनांचा तो भुकेला... जन्मलेला मर्त्य हा...
काढूनी वेळात वेळ... काढूनी वेळात वेळ...
जमवूनी सुख-शांती मेळ...
हर्ष गाणे अळवित जावे... मिळवुनी ते सुरसमेळ...
(दोघांनी मिळून...)
क्षण-क्षण करी जीवनाचा मुग्ध मोर पिसा परी...
सुख देई बरसुनी बसवी हरी तुज मुकुटा वरी...
धन्यवाद.

No comments:
Post a Comment