कविता करायची, कविता करायची
पण कशावर...!?
कविता झाल्या आईवर... कविता झाल्या देवावर...
श्रावण येता सणांच्या... तर नित्य नुतन वर्षांच्या...
कारण मिळता कागदावर सुरु होई खर-खर...
कविता करायची... पण कशावर...!?
कविता झाल्या सणांवर... कविता झाल्या ऋतुंवर...
ढग येता पावसाच्या... तर कधी गुलाबी थंडीच्या...
टिपता एक-एक क्षण हवी कवीची नजर...
कविता करायची... पण कशावर...!?
कविता झाल्या दु:खाच्या... अन थोड्या विरहाच्या...
मन अल्लड आनंदाच्या... तर कधी विनोदाच्या...
प्रेम विषय निघता खच पडे भर भर...
कविता करायची... पण कशावर...!?
कविता झाल्या देशांवर... कविता झाल्या राजांवर...
निवडणुका येता नेत्यांच्या... अवचित झालेल्या गोत्यांच्या...
सगळ्या-सगळ्या करुन झाल्या हजर...
कविता करायची... पण कशावर...!?
चारोळ्या झाल्या... लांबोळ्या झाल्या...
श्लोक झाले... दास-बोध झाले...
बालकाव्य झाली... काही कालबाह्य देखिल झाली...
कवितासंग्रह झाले... कवींकडे चक्क द्रव्यसंचय झाले...
सांगा काही शिल्लक असेल तर...
कविता करायची... कविता करायची...
अहो पण कशावर...!? आता नक्की कशावर...!?
प्रणव.

No comments:
Post a Comment