Saturday, September 27, 2014

सह्याद्री माझा


कधी भेटेल मला माझा सह्याद्री... कधी त्याच्या अंगा-खांद्यावर खेळायला मिळेल परत... त्याची माती कधी लागेल परत अंगाला... डोंगरी चढताना धपापत्या उरी श्वास भरून कधी घेता येईल ती मोकळी हवा... एक विरळाच सुगंध आहे त्याच्या वातावरणात... कपारीतून अमृतासारख्या शुद्ध आणि थंडगार पाण्याच्या टाक्याचा एक घोट... कधी मिळेल पुन्हा...!?

उन्हा-तान्हात डोंगर चढताना शिखर समोर दिसत असत... प्रत्येक वेळी वाटत असतं की कशाला आलो इथं... बसलो असतो टिव्ही समोर बुड वर करून... पण एकदा येऊन बघा... ही चटक साधी नाही... सुटतही नाही... अन विटतही नाही... हीच तर खरी मजा आहे माझ्या सह्याद्रीची...!!!

वर्षा ऋतूमध्ये तर माझ्या सह्याद्रीचा डौल बघावाच... एकदा तरी त्याच्या धबधब्यात देह भिजवावाच... हिरव्यागार गालिच्यावर रंगीबेरंगी फुलांचा ताटवा पसरावाच... स्वर्ग राहील बाजूला इतका सुंदर अन काश्मीर इतका थंडा वाच...!!

तो कणखर... तो प्रेमळ... तो रुक्ष... तो हिरवाकंच ... तो कोरडा... तो धबधबा... तो कणखर दगडी... तो उबदार माऊ ओली माती... तो उघडा बोडका... तो वनराईने नटलेला... तो तुझा... तो माझा... माझा... माझा... सह्याद्री माझा...!!!

प्रणव

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...