ढाराढूर झोपेचं आमच्या घराण्याला जणू वरदानच आहे. Acidity... इतर पोटाच्या तक्रारी आणि वय वाढेल तश्या ब्लड प्रेशर... अगदी हार्टपर्यंत तक्रारी आहेत आमच्याकडे... पण कोणाला झोपेचा त्रास आजिबात नाही. अश्या कुटुंबात ’झोपाळू बाळू’ म्हणून अग्रस्थान मी अगदी लहानपणापासून टिकवून आहे. झोप ही माझी अशी दासी आहे की जेव्हा बोलावेल तेव्हा येते... आणि कितीही हाकललं तरी जाता जात नाही. अजुनही दिवसाच्या कुठल्याही वेळी... आणि कुठेही... मी पैज लावून तीन ते चार मिनीटांत गाढ झोपून दाखवु शकतो. वयाच्या वीस-एकविसाव्या वर्षी सायलेंट मोडवर झोपणं बंद झालं आणि घोरणं सुरु झालं. हा भक्कम पुरावा असतो मला गाढ झोप लागल्याचा...!!!
अगदी लहान बाळ असताना वीस-वीस तास झोपलं तरी कुणाच्या डोळ्यावर येत नाही. पण जसं-जसं मोठं व्हायला लागेल तश्या अगदी रंजक गोष्टी ह्या झोपेवरुन घडायला लागतात. त्यात शाळेच्या वर्गात झोपण्यापासून सुरुवात होते... समस्त कुटुंबीय घराबाहेर लटकलेले आणि आपण कड्या-कुलूपं लावून घरांत निद्रादेवीच्या कुशीत... ह्यात तर माझी पीएचडी आहे. घराचे सगळे मुख्य दरवाजे आतुन बंद असताना स्वत:च्याच घरात कसे शिरायचे ह्याचा अभ्यास माझ्या बाबांनी जेवढा केला असेल तेवढा आमच्या बंगल्यावर पाळत ठेऊन असलेल्या चोरांनीदेखिल केला नसेल...! ह्याचं संपुर्ण श्रेय मी माझ्याकडे घेतो. अगदी दाराजवळच्या खिडकीतुन काठी घालून कडी उघडण्यापासून ते वरच्या मजल्याच्या बाल्कनीला शिडी लावून तिथुन आत येण्यापर्यंत सगळ्या कसरती माझ्या लहानपणी त्यांनी केल्या आहेत. त्यात अगदी सगळा शेजार गोळा होईल इतक्या मोठ्या आवाजात हाका मारणं... अगदी दार तोडायच्या दोन घाव अलिकडेपर्यंत ठोठावणं... सरतेशेवटी खटपट करुन घरात शिरणं... येवढं रामायण झाल्यावर रावणाचा रागीटपणा त्यांच्या चेहर्यावर येत असे... मला अगदी प्रसन्न मुद्रा करुन सोफ्यावर झोपलेला बघून ते नेहमीपेक्षा दसपट आवाजात ओरडत... ’अरे ए..sss... कुंभकर्णा...sss...!!!’ खर्या कुंभकर्णालासुद्धा रावणाने इतक्यावेळा उठवलं नसेल जितक्या वेळा हा एपिसोड मी लहानपणी केलेला आहे...!!!
कुठेही मी झोपू शकतो ह्याचा अजुन एक पुरावा म्हणजे... आम्ही दहा-बारा ट्रेकर्स मिळून राजगड ते तोरणा पदभ्रमण करायला गेलो होतो. राजगड साधारण सकाळी आठ वाजता सोडला आणि तोरणाच्या दिशेनी चालायला सुरुवात केली. अंदाजे दहा किलोमीटरचा टप्पा पण मध्ये बरेच छोटे मोठे डोंगर-टेकड्या पार करत जावं लागतं. त्यात वाटेत एकही मोठं झाड नाही. सगळी झुडपं आणि करवंदाच्या जाळी. दिवस डिसेंबरचे असले तरी एकदा सुरव्या डोक्यावर आला की बोलायला नको. सगळ्यांच्या जिभा सुकुन टाळूला लागल्या होत्या. तोरणाची बुधला माची नुसतीच समोर दिसत होती पण अंतर काही संपत नव्हतं. दुपारी तीनच्या सुमारास एकदाचे आम्ही तोरणाच्या बुधल्याजवळच्या दरीवर आलो. अगदी निमुळती वाट आणि जेम-तेम आठ-दहा फुटांवर खोल कडा. पण चार-पाच तासांनंतर सावली मिळालेली. एकमताने मुक ठराव पास करुन सगळ्यांनी सावधपणेच कड्याच्या टोकावर आपापली बुडं जेम-तेम टेकली. विश्रांतीचा एकही क्षण न दवडता मी ढाराढूर...!! कड्याच्या टोकावर जिथे बसायला जागा नाही तिथे मी घोरायला लागल्यावर बाकीच्यांनी मला हालवून जागं केलं. पण ह्या तीन-चार मिनिटांच्या पॉवर nap मध्ये मी माझी battery नेपोलियनसारखी पुन्हा चार्ज करुन घेतली होती आणि तोरण्याच्या मंदीराकडे बागडत चालायला सुरुवात केली... बाकीचे मात्र मागे अजुन पाय खरडतच चालत येत होते.
शाळेचा अभ्यास करताना आणि मुख्य म्हणजे परिक्षेचा अभ्यास करताना येणारी झोप हा सगळ्यांत सुखद अनुभव. शाईपेनाने वहीवर लिहीत असताना आलेली पेंग अक्षरावरुन दिसत असे. एखादा किडा शाईत बुडवून कागदावर सोडला तर त्याच्या चालण्याने जी काही नक्षी कागदावर उमटेल तसं काहीतरी पेंगताना लिहीलेलं दिसत असे...!! असो...!!
मी कुठल्याही वेळी झोपू शकतो कारण... ते... एकदा मागे... असंच... जेव्हा..ss.. मी... तिथुन जाताना... तरी... हम्म...sss... मम्म...ss.. तु.........
प्रणव.

No comments:
Post a Comment