निगडीला आमच्या घराजवळ एक मिलिंददादा म्हणुन राहायचा. खुप छान तबला वाजवायचा. आम्ही सगळी लहान-लहान मुलं त्याच्या भोवती कोंडाळं करुन कौतुकानी ते बघायचो. त्याच्याकडून मी तबल्याचे धा...ता...धिं...तिं... येवढे तरी ओळखता येतील इतकी तबल्याची माहिती घेतली. मी फारतर सात-आठ वर्षांचा असेन तेव्हा. पण तबल्याची आणि तालाची आवड इथुन सुरु झाली असावी. आपली आवड म्हणजे साधीसुधी कधी नव्हतीच...! डायरेक्ट झाकीर हूसेन व्हायचेच स्वप्न...! त्रिशूलमधला अमिताभ आपला पहिल्यापासुनच आदर्श आहे. म्हणजे विडीने सुरुंग पेटवत लहानाचा मोठा झालेला अशिक्षित खाण कामगार... आईच्या शेवटच्या इच्छेसाठी दिल्लीच्या सगळ्यांत मोठ्या बिल्डरला अवघ्या वर्षभरांत जेरीला आणतो... हेच समीकरण सगळीकडे...! पण त्या झाकीरला त्याचे वडील अल्लारखा एका खोलीत डांबून ठेवायचे. खोलीत फक्त जेवण आणि तबला ठेवलेला असायचा. अठरा-अठरा तास नुसता रियाज... रियाज...! हा तपशील समजून घेणं जरा अवघड मामला होता.
पुढे चौथी-पाचवी मध्ये असताना इंगळे सर भेटले. त्यांच्याकडे रितसर तबल्याचा क्लास लावला. त्रिताल, दादरा, झपताल, केरवा आणि भजनी असे पाच बेसिक ताल शिकून घेतले. एक परिक्षासुद्धा दिली. पण काही कारणाने खंड पडला. त्यानंतर थेट पुढे इंजिनीयरींगला गेल्यावर बारामतीला भापकर सर भेटले. पण ते मुख्य गाण्याचे शिक्षक. त्यात तिथल्या भजनी मंडळाचे पेटंट तबलजी. त्यामुळे भजनी ठेका आणि केरवाशिवाय ते जास्त कधी वाजवायचेच नाहीत. त्यामुळे मी सुद्धा हेच ताल जास्त शिकलो. समोर तबला आला की भजनी ठेका...!! माझ्या काकू तर मला ह्यावरुन चिडवायच्या देखिल. पण कुणाचंही दिर्घकाळ मार्गदर्शन न घेता एखादं भजनी मंडळ चालवता येईल इतका आत्मविश्वास नक्कीच आला होता. हा भजनी ठेक्याचा आत्मविश्वास इतका बळावला की कुठलही गाणं त्यावर बसवायची करामत सुरु झाली. आणि करणार तरी काय. कुणाला गाणं म्हण म्हणलं की लोक एकतर भजन म्हणतात नाहीतर जुन्या हिंदी पिक्चरमधलं गीत...! भजनं मोजकी आणि ठरलेली... आणि हिंदी गाण्यांवर तबला वाजवायचा म्हणजे उजेडच...! पण काही का असेना झाकीरच्या दिशेनी एक पाऊल पुढे सरकल्याचा निदान भास तरी होत असे.
घरी तबला असेल तर थोडंफार तरी टचमध्ये राहता येतं...! माझे मित्र... एखादा नातेवाईक ह्यांच्याकडे गेल्यावर त्यांचा तबला आणि त्यात त्यांची उत्तरोत्तर प्रगती बघायचा योग येई आणि मला काही करता येत नाही ह्याचा रागही येई. आत्ता घेऊ... मग घेऊ करत माझा तबला कधी घेतला गेलाच नाही. मग लग्न... नोकरी... घर... ह्या व्यापात बाकी छंद मागे पडले तसा हा सुद्धा...! मात्र ह्या सगळ्यांत कान सतत काहीना काहीतरी ऐकत राहिले आहेत. इंडियन क्लासिकल म्युझिकची आवड मुख्यत: त्यातल्या तबल्याने लागली असावी असा माझा अंदाज आहे. चांगला तबला असलेली बंदीश जास्त भावते ते कदाचित ह्याच कारणाने असेल. त्यात ती एकताल अथवा त्रितालात असेल तर विचारायलाच नको...! हे माझे सगळ्यांत आवडते दोन ताल... त्रिताल आणि एकताल...!
पुण्याला स्वत:चं घर आणि बाकी गोष्टी स्थिर-स्थावर झाल्यावर पुन्हा एकदा ह्या मागे पडलेल्या गोष्टी कराव्यात असं वाटू लागलं. सईचा भाऊ तबल्यात विशारद असल्याने त्यालाच घेऊन कर्वे रोडवरच्या एका ख्यातनाम तबलेवाल्याकडून एक छानसा तबला विकत आणला. घराजवळच एक तबल्याचा क्लासदेखिल बघुन आलो. जोरदार तबलावादन करुन रसिक मंत्रमुग्ध करण्याचं स्वप्न बघू लागलो. पण पुन्हा एकदा नविन कारण मिळालं. नोकरीसाठी परदेशांत जाणं भाग होतं. नवाकोरा तबला पुण्याला सोडून मी इकडे आलो. एक-दोन प्रयत्नांनंतर गणपतीच्या कार्यक्रमात तबला वाजवायची संधी आता मिळाली आहे. गेले दोन महिने इथेच एकाचा तबला घेऊन निरनिराळ्या ’भजनांवरच’ प्रक्टीस चालू आहे. पुन्हा एकदा थोडा आत्मविश्वास वाटू लागला आहे. परवा तर चक्क माईकसमोरदेखिल तबला वाजवून बघितला. माझ्या आयुष्यातला पहिला-वहिलाचा अनुभव. स्टेजवर तर अजून गेलोच नाहीये. एक खुप जिव्हाळ्याने वागणार्या हौशी गायक-वादकांचा ग्रुप आहे. सांभाळून घेत... सुचना देत... प्रोत्साहन देत... संधी देतायत स्टेजवर तबला वाजवायची...!
माझ्या झाकीर हुसेन बनण्याच्या लक्षाकडे हे जवळ-जवळ तिसरे पाऊल आहे... तिथे पोचायला अजुन दोन-अडीच कोटी पावलंच शिल्लक राहिली आहेत... That's it...!!!
प्रणव.

प्रणव,
ReplyDeleteब्लॉग च्या नावाप्रमाणेच सहज व सोपे लिहिले आहेस. आता ३०-ऑगस्ट ला तुला प्रत्यक्ष बघायचा व ऐकायचा योग येईलच.
आणि पुढेही स्टेजशी तुझे नाते अधिक जुळत जावो ही सदिच्छा. धन्यवाद.
सतीश केळकर.