एकट्या एका मध्यान्ही
बसलो होतो उन्हात
शांत होते चित्त पण
विचार चालले होते मनात
काळीभोर घनदाट सावली
माझ्यासमोर पडली होती
मी स्तब्ध होतो म्हणून
तिही अडली होती
पाहून तिची लाचारी
मी मनात हसलो
क्षणात आठवून साथ तिची
मनातल्या मनात हिरमुसलो
मी आनंदी असताना
तिही उत्साही दिसत होती
सुखांच्या क्षणी माझ्या
बरोबरीने बागडत होती
दु:खात मी चालताना
धरुन मला चालत होती
उन्हात माझ्या बरोबरीने
ती स्वत:ही पोळत होती
अशी साथ, असा आधार
कोणीतरी देईल का?
जीवनाच्या ऊन वार्यात
माझी सावली कुणी होईल का?
प्रणव.
No comments:
Post a Comment