हे मराठी टायपिंग करता आल्यापासून खुप बरं झालंय. जे काही सांगायचय ते इंग्रजीतुन सांगतानाचा केविलपणा टळावा म्हणून मातृभाषा बरी पडते. पण ह्या मराठी लिखाणात अडसर होत असे हस्ताक्षराचा. अक्षरावरुन लोकांनी तुमची किंमत ठरवण्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. विचार बाजूला राहणार आणि फर्स्ट इंप्रेशनच खराब. माझा शाळेत अगदी सुरुवातीच्या इयत्तांपासूनचा मित्र... अतुल...! आमची अगदी सख्ख्या भावासारखी मैत्री. पुणतांबेकरबाईंच्या आवडत्या विद्यार्थ्यांपैकी आम्ही दोघं. त्या माऊलीनी आम्हाला नुसतं शिक्षिकेचं नाही तर आईचं प्रेम दिलं. मुलांविषयी येवढी तळमळ त्यानंतर मला फार कमी गुरुवर्यांमध्ये दिसली. पुणतांबेकर बाई, माझं चित्रकला स्पर्धेसाठी आणि अतुलचं हस्ताक्षर स्पर्धेसाठी आम्हाला न विचारता नाव देऊन टाकत. आम्हीही त्यांचा कधी हिरमोड केला नाही. अतुलचं अक्षर अगदी लहानपणापासून मोत्यासारखं. गंमत म्हणजे मला आणि अतुलला सलग काही वर्ष एकसारखी बक्षिसं मिळत गेली. मी चित्रकलेत उत्तेजनार्थ तर तो हस्ताक्षारात उत्तेजनार्थ... त्याचा तृतिय क्रमांक तर माझाही तोच...! एक वर्ष आम्ही दोघंही प्रथम क्रमांकावर होतो. पुढच्या वर्षी मी शाळा बदलून दुसरीकडे गेलो. त्या वर्षी अतुलने स्पर्धेमध्ये भाग घेतला होता पण त्यात त्याचा नंबर आला नाही... हे त्याने मला एका पत्रात सुंदर अक्षरांत लिहून कळवलं होतं.
हे सगळं इथपर्यंत ठिक होतं. पण माझी खरी गोची व्हायची ते पुणतांबेकर बाई माझ्या आईला भेटायला शाळेत बोलावत असत तेव्हा. माझ्या सगळ्या कर्तुत्वाचा येथासांग पंचनामा करुन झाल्यावर त्या माझ्या अक्षरावर येत असत. त्यात नुसतं ते खराब आहे म्हणून सोडून द्यावं की... तर अतुलच्या अक्षराचं उदाहरण देऊन त्याला त्याची वही आणायला सांगत. मला अजुनही आठवतं त्यांचं बोलणं... "दोघं येवढे मित्र पण केवढी ही तफावत बघा. ह्याचं अक्षर अगदी मोत्यासारखं आहे आणि तुमच्या प्रणवचं म्हणजे कुत्र्याचे पाय मांजराला आणि मांजराचे पाय कुत्र्याला...! अगदी गचाळ...!"
तेव्हा मी मनातुन जोर-जोरांत ओरड्त असे... अहो पण त्याची चित्रकलेची वही पण मागवा ना... मागवा... मागवा...!!!
प्रणव.

No comments:
Post a Comment