पुरेसे पैसे असणं हेच प्रत्येक वेळेस उपकारक ठरतंच असं नाही. एकदा पं. हृदयनाथ मंगेशकरांनी सारेगमप मध्ये एक अनुभव सांगितला होता... ’जीवलगा राहिले घर माझे...’ ह्या गाण्याच्या रेकॉर्डींगच्या वेळेस दोन कडव्यांच्या मध्ये व्हॊईलिनचे असलेले भाग वाजवणार्याला कलाकाराला पैसे द्यावे लागणार होते. केवळ तीनशे रुपये त्यांच्याकडे नसल्याने ते घेता आले नाहीत. त्यांनी आपल्या बहिणीलाच... म्हणजे आशाताईंनाच नोटेशन्सवर आलाप गायला लावले. आणि आज त्या जागा नवोदितांसाठी एक प्रेरणा आणि एक साध्य होऊन बसल्या आहेत... गाण्यातल्या माईलस्टोन होऊन बसल्या आहेत. किती बरं झालं की त्यांच्याकडे ते तीनशे रुपये नव्हते... नाहीतर आज आपण आज एका अजरामर कलाकृतीला मुकण्याची दाट शक्यता होती...!
पुलंनी असाच एक अनुभव सांगितला होता... पुरेशी शांतता असेल आणि ऐकणारे कान असतील तर रेल्वेच्या पंख्यातुनही तंबोर्याच्या स्वरातले षड्ज-गंधार ऐकू येऊ शकतात...!
ह्या दोन्ही अतिमानवांच्या वचनांचा प्रत्यय आज आला... शांत घरात बसुन अवघे बारा डॉलर देऊन आणलेल्या पंख्यातुन तंबोर्याचे स्वर लागलेले ऐकण्याचा अनुभव... एरवी एसीच्या अंगावर काटा आणणार्या भयाण शांत शीतलतेपेक्षा नक्कीच वेगळा अनुभव...!!
प्रणव.

No comments:
Post a Comment