आयुष्यभर एकमेकांची गरज असते म्हणून नवरा बायको सहसा टोकाची भांडण करत नाहीत. एक आजी-आजोबा सोडले तर जगात असं एक नातं मला दाखवा ज्यात वाद नाहीत. मी पैज लावायला तयार आहे.
नात्याचा खरा कस लागतो ह्या वादानंतर... झालेल्या धुसमुसीने उसवलेले धागे अजून उसवत जायचे की नवीन टाके घालून मैत्रीची वीण अजून घट्ट करायची ह्यावर नात्याचं भवितव्य अवलंबुन असतं.
त्यासाठी व्यक्ती आणि प्रॉब्लेम वेगवेगळे पारखता आले पाहिजेत. आपण त्या व्यक्तीलाच प्रॉब्लेम समजतो आणि सगळा घोळ होतो. इथे नीर-क्षीरविवेक दाखवणारे ह्या धक्क्यातून तरून जातात आणि आयुष्यभराचे सोबती होतात...!!
प्रणव.

No comments:
Post a Comment