Thursday, May 8, 2014

जगण्याचा धडपडाट

सं समुद्रात मासे एका वेळेस लाखो अंडी घालतात... त्यातली काही हजार पिल्लं बाहेर येतात... शेकड्यात मोठी होतात. त्यांचं विश्व इथे सीमीत आहे... पण माणसाला ह्यापुढे एक पायरी आहे... लाखो जन्माला येतात... हजारो जगतात... शेकडो प्रयत्न करतात... त्यातले दहा विचार करतात की काय केलं पाहिजे... आणि एखादा ते करुन दाखवतो...! पण त्यासाठी प्रोबेबिलिटी म्हणजेच वारंवारता निर्माण होणं गरजेचं आहे...! त्यासाठी लाखो जन्मांनी ह्या रगाड्यात उतरलं पाहिजे... वळ-वळ केली पाहिजे... पुढे-पुढे सरकलं पाहिजे...! प्रत्येकालाच युगपुरुष म्हणून मिरवता येणार नाही. पण त्याच्या पायाचा दगड म्हणून जगता आलं पाहिजे. कुठल्याही महापुरुषाच्या मागच्या कित्येक पिढ्या कठोर उपासना आणि अथक परिश्रम घेत असल्याचे पुरावे आहेत. पिढ्यान पिढ्या लाकडावर लाकूड घासण्याचं काम केल्यानंतर एखाद्या अवचित क्षणी ठिणगी पडून इतिहास लिहिला गेला आहे. पण म्हणून मागच्या पिढ्यांच्या आयुष्याचा उपयोग नाही हे म्हणणे चुकीचे ठरेल.

तात्पर्य: सामान्य मनुष्य नुसता जन्माला आला आणि धडपड करत जगत एक दिवस संपला तरी त्याच्या धडपडीतुन एक अदृश्य उर्जा समाजाला मिळत असते ज्यातुन एखादा तेजस्वी जीव जन्माला येण्याची शक्यता अधिक वाढते...! तेव्हा सामान्य पातळीला का होईना सतत धडपड करत राहणं गरजेचं आहे...!


प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...