Wednesday, April 30, 2014

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून...

महाराष्ट्राची माती 
याची काय सांगावी महती...

प्रथम स्मरण गणेशाचे
मग भय ना कार्यसिद्धीचे
सुवर्ण पितांबर, लंबोदर हे वरती
रक्त कमळ शोभतसे हे गंडस्थळावरती
अष्टही विनायक जिथे वास करती...
महाराष्ट्राची माती
याची काय सांगावी महती...

ज्ञाना झाला राजा
अवघ्या सोळाव्या वर्षी
सोनेरी वर्षे घालवली 
याने जनहिताच्या खर्ची
गीता केली सामान्यांना
भाषा ही उमगती...
महाराष्ट्राची माती 
याची काय सांगावी महती...

शिवराय प्रगटले होऊन
दीनांचा कैवारी
साथ घेऊन सह्याद्रीची
शत्रुस पडतसे भारी
युगपुरुषाच्या पदस्पर्शाने
पावन झाली ही धरती...
महाराष्ट्राची माती 
याची काय सांगावी महती...

बेडी पायात गुलामीची
हाक ऐकली आईची
लोकमान्य अन सावरकर
गोखले अन चाफेकर
मराठी या वीरपुत्रांनी
स्वतंत्र केली ही सती...
महाराष्ट्राची माती 
याची काय सांगावी महती...

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...