पाडव्याच्या पहाटे दिनकररावांच्या ’सौं’ नी त्यांना तेल, उटणं लावून अभ्यंगस्नान घालायचा घाट घातला होता. स्नानाच्या मधोमध त्यांनी अचानक स्नानगॄहाचा दरवाजा उघडला आणि बंड्या-चिंगीला हाका मारायला लागल्या. बंड्या दोन्ही हातात पेटत्या फुलबाज्या घेऊन समोर आला आणि चिंगी नुसतीच समोर येऊन जोर-जोरात उड्या मारत गाणं म्हणू लागली... "दिन-दिन दिवाळी... गाई म्हशी ओवाळी... दिन-दिन दिवाळी...!" आधीच वर्षातुन एकदा सप्त्निक स्नानगॄहात उघडेबंब बसून अवघडलेल्या दिनकररावांची अवस्था आणखीनच दीनवाणी झाली...! त्यात पोरट्यांनी पण काय हे गाणं काढलयं... ’दिन-दिन दिवाळी’ पर्यंत ठीक होतं... पुढे फुलबाज्यांनी डोळ्यासमोर वर्तुळं काढत ’गाई-म्हशी ओवाळी’ म्हणत ओवाळून घेणारे हतबल दिनकरराव आणि... दीन-दीन करत चाल करुन आलेला अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीच्या बुरुजावरुन पाहणारा राजा रामदेवराय... ह्यांच्यात फरक इतकाच की आमचे दिनकरराव उघडेबंब बसले होते... बाकी चेहर्यावरचे भाव तंतोतंत तेच...!
हे भाव कुठले हा विचार करायला डोक्याला जास्त ताण देण्याची गरज नाही... स्वत:च्या लग्नाचा फोटो अल्बम काढून बघितला की लगेच कल्पना येईल. नव्वद टक्के लोकांचे लग्नाचे अल्बम ह्या भावांनी ओतप्रोत भरलेले असतात...! आधीच स्वत:च्या लग्नप्रसंगाला आपण पहिल्यांदाच (आणि बहुदा शेवटचेच) अवतरलेलो असतो. आधीचे कितीही लग्नप्रसंग अटेंड केले असले तरी स्वत:च्या लग्नाचा अनुभव घेतल्यावरच कळतो. त्यात भटजींनी नाही-नाही ते विधी... (अहो लग्न कार्याचे विधी... चा..व..ट...!) सांगुन जेरीला आणलेले असते. अवती-भोवती एखाद्या नटासमोर अथवा नेत्यासमोर असावेत येवढे कॅमेरे असतात... ऐन लग्नात छान दिसावं म्हणून आणलेला महागातला सुट... शेरवानी... सगळं सांभाळत बसायचं... त्यात ह्या बसायच्या पाटांचा साईज कुठल्या गाढवाने ठरवलेले असतात काय माहित. पुढे सरकावे तर पाय खाली जातात... पाय वर घेतले की पाटांची कड बुडाला रुतायला लागते... ह्या सगळ्या भानगडीतुन सतत हसरा आणि करारी का काय तो म्हणतात तसला चेहरा करायची धडपड... कारण श्वशुर गृहीची मंडळी आणि नववधू पाहतेय म्हणून...!
हल्लीच्या लग्नात एक नविनच भानगड सुरु झालीये. एखादा विधी होत असताना... (पुन्हा तेच... अहो पुजा विधी...!) मुलीकडच्या फोटोग्राफरने धक्क-बुक्की करत पुढे जात योग्य क्षण टिपलेला असतो. आता मुलाकडच्या फोटोग्राफरचा हा shot मिस झाला म्हणून तो ॲक्शन रिप्ले घ्यायला लावतो. पुन्हा तेच करायचं ह्याच्या फोटोसाठी... हे काय पिक्चरचं शुटींग चाललय का सीन चांगला मिळेपर्यंत परत-परत करायला...!? बरं मुलाकडचा फोटोग्राफर म्हणून कोणी ह्याला आडवत देखिल नाही. कारण हा मुलाच्या कोण्या दूरच्या मावसबहिणीचा नवरा असतो. तसा मुलाकडच्यांचा लांबचा जावईच... म्हणजे मुलीकडच्यांसाठी जावयांचा जावई...! अश्या डबल जावयाचा ह्या लग्नांत नुसता धुमाकुळ चालू असतो. खुद्द माझ्या लग्नात ह्या फोटोग्राफर जावयाच्या करामतींनी मी हैराण झालो होतो. दिवसभर क्लिक-क्लिकाट करुन ह्याचं मन भरलं नाही म्हणून ह्यानी संध्याकाळी आम्हा दोघांना कार्यालयाच्या गार्डनमध्ये फोटो काढायला नेलं... खेतवाडीच्या जत्रेत पडद्यावर पेंट केलेल्या वॄंदावन गार्डनसमोर शोभतील असल्या पोजेस घेऊन जवळ-जवळ दीड तास आमचे फोटो काढले. ह्या वेळांत इकडे सगळ्यांनी सामानाची आवरा-आवरी करुन गाडीत टाकलं. मला ती बोजड शेरवानी बदलण्याचा चान्सही मिळू दिला नाही. सोलापुरच्या हैराण उकाड्यातुन परतीचा सहा तासांचा प्रवास ह्या शेरवानीतच करावा लागला. शेरवानीच्या आत जरा इकडे-तिकडे पाच-सहा बटाटे ठेवले असते तर घर गाठेपर्यंत चांगले शिजले असते रात्रीच्या जेवणाला. आमच्या लग्नाच्या काही मोजक्या आठवणीत येवढीच काय ती अजुन एक. असो.
मागे एका लेखात वाचले होतं तसं... काहींचे फोटो म्हणजे ’प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ असे तर काहींचे म्हणजे ’आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’ असे...! हे फेसबुकवरचे फोटो हे त्याचच एक उदाहरण...! कोणालाही आपलं ओपन चेलेंज... तुमच्या लायसन्सवरचा फोटो फेसबुक प्रोफाईलला लावून दाखवावा... बास...! बाकी आपले फोटो आपल्यालाच न आवडणं ही अतिशय कॉमन सायकॉलोजी... त्याला इलाज नाही. एरवी आपले शंभर दुर्गुण लपवण्याचा आटापिटा करत असतो पण स्वत:च्याच फोटोचं कौतुक करणारे कधी दिसत नाहीत. आणि असा जर कोणी दिसला तर समजुन घ्या की ह्याच्या मनोधैर्याचा किल्ला पुर्णपणे ढासळला आहे आणि शेवटचा बुरुज सांभाळण्याचा हा प्रयत्न चालू आहे. पुन्हा असो.
बाकी फोटोत दिले जाणारे एक्सप्रेशन्स हा एक पी.एच.डी.चा विषय होऊ शकेल. काहींचे हास्य इतकं अति-उत्साहाने फुललेलं असतं की बघणार्याला प्रश्न पडावा ह्याचा हा फोटो अमिताभ बच्चनने काढला आहे की काय... त्यामुळे ह्याचे हे भाव आहेत. काही लोकांना फोटोत डोळे तारवटायची सवय असते. दुपारच्या गाढ झोपेत असताना थंडगार पाण्याचे शिपके तोंडावर मारुन फोटोसाठी उठवल्यासारखे... काहींचे म्हणजे फोटोच्या आधी दोन कानाखाली ओढल्यासारखे... जसे काही तालीबानांच्या हातात सापडला आहे आणि त्यांनी ओलीस ठेवल्याचा पुरावा म्हणुन ह्याचा फोटो काढून पाठवला आहे. माझ्या पाहण्यात एक अगदी कॉलेजची नवतरुणी होती. फोटोत रोज नवनवे ड्रेसेस... पोजेस.. काही मैत्रीणींसोबत.. तर काही अगदी मित्रांसोबत देखिल. फोटो छान असतात पण एक्सप्रेशन सगळ्या फोटोत तेच... अगदी मठ्ठ... आधी अध्याऋत सांगुन झाले मग अगदी स्पष्टही... पण काही बदल नाही. हिच्या चेहर्यावर आताश्या माश्यांचं पोळं लागलं आहे. (ही चेहर्यावरची माशीही न उठण्याच्या पुढची स्टेज आहे.) काही कुटुंबांच्या रक्तातच एक गुण असतो. फोटोसाठी कॅमेरा समोर दिसला की हे समस्त कुटुंबीय ’अटेंन्शन’ म्हणल्यासारखे एक लाईनीत उभे राहतात. हात, पाय, चेहर्यावरचे भाव, हास्याचे प्रमाण सगळं-सगळ्ळं अगदी एकाच मापट्यात मोजून काढल्यासारखं...! आमच्या गल्लीत एक काका आहेत. त्यांचा एकही फोटो साध्या हास्याचा नाही. सतत काहीतरी बोलत आहेत असेच सगळे फोटो. वास्तविक फोटोचे क्लिक हा सेकंदाच्या काही अंशाचा भाग असतो. त्यात त्यांना काय येवढं सांगायचं असतं काय माहित. एरवी काकूंसमोर ह्यांना मनमोकळेपणाने शिंकताही येत नाही हे सगळ्या गल्लीला माहित आहे. आणि काकू मात्र सगळ्या फोटोत अगदी सोज्वळ. अगदी मोलकरीण मधली सुलोचनाच. एरवी ह्या ललिता पवार बनुन काकांना बुकलून काढत असतात.
ट्रिपला फोटो काढणार्यांमध्ये दोन प्रमुख प्रकार असतात. काही लोक स्वत:चेच इतके फोटो काढतात की विचारु नका. कुठे ट्रीपला गेले होते ते फोटोवरुन कळतच नाही. ताजमहालासमोर कुटुंबीयांची भिंत उभारुन फोटो काढतात. ताजमहालाची एक वीटही दिसत नाही. त्या बिचार्या शहाजहानला काय वाटेल ह्याचा जरासुद्धा विचार करत नाहीत. सांगावं लागतं की हा ताजमहालासमोर काढलेला फोटो आहे. काहींचं ह्याच्या उलट असतं. ढीगारभर फोटो काढतात पण हे स्वत: त्यात कुठेच दिसत नाहीत. डिस्कव्हरी चेनेलवरचा एपिसोड बघावा तसं. नुसतीच शिन-शिनेरी. भुताटकीत ह्यांचा कुठे पत्ताच नसतो.
जुने फोटो बघणं हा एक खुप मोठा सुखद विरंगुळा असतो. आपण तरुणपणी स्मार्ट दिसतोय असं आपल्याला जेवढं वाटत असतं तेवढे तेच फोटो बघून नंतर हसूही येत असतं. तेच फोटो परत मास्टरपीस होण्यासाठी एक पिढीचं अंतर जावं लागतं. फोटो हे एक माध्यम आहे आपल्या आठवणी कागदावर उतरवून कुठेतरी नोंदवून ठेवण्याचं. कागदाच्या अल्बनना समांतर आठवणींचे असंख्य अल्बम आपल्या स्मृती पटलावर असतात. आत्ता चांगले अथवा वाईट वाटणारे क्षण पुढे जाऊन सुखद्च होत असतात. विरंगुळा होत असतात. ह्यातलेच काही पुढच्या पिढीला मास्टरपिस व्हावेत हा सतत प्रयास असवा... आणि त्यासाठी अव्याहत जगणं क्लिक करत राहणं गरजेचं आहे... आनंदाच्या... दु:खाच्या... थकल्या-भागल्या... आयुष्याच्या कुठल्याही अवस्थेत... स्वत:च्याच मनाला सारखं-सारखं सांगत... भैय्याजी स्माईल...!
प्रणव.

No comments:
Post a Comment