रोज सकाळी पेपर वाचायचा... राजकारण्यांना शिव्या द्यायचा...
देशाचं पुढे काहीच न होण्याचा... आणि हे आपण नुसतं बघत बसण्याचा...
कंटाळा आला आता...
मोदींना फेसबुकवर सपोर्ट करण्याचा... वोटींग मात्र न करण्याचा...
पप्पुची चेष्टा करण्याचा... आणि एखाद दशकात त्यालाच पंतप्रधान म्हणून बघण्याचा...
कंटाळा आला आता...
रोजच्या नविन घोटाळ्याचा... मोठ-मोठे आकडे वाचण्याचा...
थोडे दिवस चर्चा करण्याचा... लगेच विसरुन जाण्याचा...
कंटाळा आला आता...
समजुन-उमजुन काना-डोळा करण्याचा... नको तिथे खल करत बसण्याचा...
वादाला वाद घालण्याचा... संवाद तोडून टाकण्याचा...!
कंटाळा आला आता...
अपघात, दंगली, मोर्चे बघण्याचा... मॄतांची नावं वाचण्याचा...
मनापासून धड वाईटही न वाटण्याचा... सगळ्यांत स्वत: अलिप्त राहण्याचा...
कंटाळा आला आता...
रोजच्या रोज महागाई वाढण्याचा... जुन्या किंमती आठवण्याचा...
हतबलतेने नुसतं बघत बसण्याचा... मुकाट्याने सगळं मान्य करण्याचा...
कंटाळा आला आता...
रोज सकाळी उठायचा... दिवस संपला की झोपायचा...
मधल्या वेळात जगापासुन स्वत:ची खरी ओळख लपवायचा...!
कंटाळा आला आता...
बास झालं यार... कंटाळा आला आता...!!
-प्रणव

No comments:
Post a Comment