माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढण्यापुर्वी जरा मी काय म्हणतोय ते ऐका... मग सांगा मी चूक की बरोबर...!
तीनशे पासष्ठ दिवसांतला एकच दिवस... महिला दिन...!? अमान्य... सपशेल नकार आहे आपला...!!
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येणारी पहिली स्त्री... आपली आई... खरं तर ती नाही... आपणच येतो तिच्या आयुष्यात... पोटात... त्याचं वैतागून नव्हे... सुखाऊन स्वागत करते ती... नऊ महिन्यात... त्या दोनशे सत्तर दिवसांतला एकच... मानभावेपणाने बालक दिन साजरा करणं नाही म्हणत मी... एकच दिवस सुट्टी जरी घेतली असती तिने... तरी परत त्या शुन्य अंधारात फिरत बसलो असतो...! त्यानंतर आपल्याला स्वत:ची शुध्द येईपर्यंत सगळेच्या सगळे दिवस तिने कष्ट करायचे आणि आपण साजरे करायचे ह्याच्यात जातात...!
एका स्त्रीच्या मायेचं... उपकाराचं... मोजमाप अजून टिपुन ठेवतोय न ठेवतोय... तोवर दुसरीची गरज पडू लागते... लग्न... बायको ह्या रुपाने दुसरी आयुष्यात येते... सकाळच्या गरमा गरम चहापासून ते रात्री जेवणानंतर आईस्क्रीमपर्यंत सगळं तुम्हाला हातात आणून देते... तुम्हाला वाटत असलेली प्रेमाची गरज ती पुर्ण करते. सगळी सुखं-दुख: शेअर करायला एक चांगली सहचरणी होते. तुम्हाला काहीतरी कर्तुत्व गाजवायला लावणारी प्रेरणा होते. तुमच्या वंशवृध्दीसाठी महत्वाची भुमिका बजावते...!
आईचं प्रेम तुम्हाला न मागताच मिळतं... बायकोचं दोघांच्या गरजेतुन आपोआप मिळत जातं... आणि त्याहून तुम्ही नशिबवान असाल तर स्त्रीचं एक गोंडस रुप तुमच्या आयुष्यात येतं... मुलीच्या रुपांत...! त्याचं वर्णन शब्दांत करणं अशक्य आहे...! आई माया देते... बायको प्रेम देते... तर मुलगी प्रेम करायला शिकवते... पुरुषाला खर्या अर्थाने माणूस बनवते. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवायला शिकवते. आपल्या नकळत... अगदी तिच्याही नकळत. दुसर्या स्त्रीकडे बघण्याची पुरुषाची नजर... मुलगी शुद्ध करते. हि किमया आई करत नाही आणि बायको तर नाहीच नाही...!
आईशी बोलता वागताना आपल्याला काहीच जाणिव नसते तिच्या तक्रारींची... गरजांची... जाणिवांची... अपेक्षांची... बायकोमुळे तक्रारी आणि गरजा कळू लागतात... अपेक्षाही पुढे येतात... पण मुलीशी नातं ह्या सगळ्या पलिकडे आहे. तुम्हाला स्वत:ला एक झाड झाल्यासारखं वाटतं... भरपुर घनदाट सावली देणारं... मुलगी त्या सावलीत आलेलं एक गोजिरवाणं कोकरु. तुम्हाला वाटेल... तिला तुमच्या भक्कम आधाराची गरज आहे... माहित नाही... पण तिच्यापासून थोडा विरह जाणिव करुन देईल... खरा आधार तुम्हीच घेतलाय तुमच्या लेकराचा...!
ह्या मेन सर्कलच्या लगेच पुढे बहिण... आज्जी... मावशी... अगदी आपल्या मुलीची यथायोग्य काळजी घ्यावी म्हणुन का होईना जावयाची काळजी करणारी सासू... अशी अनेक स्त्रीरुपं आपल्या आसपास आपल्या आयुष्याच्या अविभाज्य घटक बनून गेलेली असतात...!
एखादी मैत्रीण देखिल आपल्याल बर्याच गोष्टी शिकवून जाते. बायकोने दिलेली एखादी प्रतिक्रिया लगेच आवडत नाही... पण तिच जर मैत्रिणीने दिली तर पटतं की हेच बरोबर असेल...!
थोडक्यात काय तर जेवढी स्त्रीला आधाराची... संरक्षणाची... प्रेमाची गरज आहे तेवढीच पुरुषालाही आहे...! हे मान्य करण्यात ज्या पुरुषांचं पुरुषपण आड येतं त्यांना त्यांच्या पुरुषपणाविषयीच शंका असावी...! मग जर दोघं एकाच पातळीवर आहेत तर वर्षातला एकच दिवस कशाला पाहिजे साजरा करायला...!? मान द्यायला...!? दिवस ठरवून ती गोष्ट करावी लागते जी आपण रोज करत नाही...!!!
मुलगा... नवरा... बाबा... भाऊ... आणि मित्र... ह्या माझ्या वेगवेगळ्या नात्यांमधून मला भेटणार्यां शक्तीरुपांचे... प्रेमरुपांचे... कामरुपांचे... आणि स्नेहरुपांचे माझ्या आयुष्यातील स्थान मला शंभर टक्के मान्य आहे... आणि ते मान्य करायला मला कुठल्या एका विशेष दिवसाची गरज वाटत नाही...!
प्रणव.
We have a rule - follow the west. We like to follow western culture & think it is alright to do without thinking any further. Any such 'xyz day' is a commercial cum cultural brainwash. More we discuss or give importance to it, more it will be popular.
ReplyDeleteThat is exactly what I am trying to say in my blog. But if you tell directly to stop it, people tend more to do it. Instead I would prefer to explain baseless intentions behind these so called days.
Delete