मला लहानपणी असंच वाटायचं..
व्हिलन तरुण हिरोला मारतो..
हिरो दुसरा जन्म घेतो... (दुसर्यांदा पहिलीपासून शाळा करत) मोठा होतो... मग बदला घ्यायचं रिकॉल झालं की व्हिलनला मारतो..!!
म्हणजे पहिल्यांदा हिरोला मारलं तेव्हा व्हिलनचं वय तीस-पस्तीस धरलं तर हिरो पुर्नजन्म घेऊन बदला घेईपर्यंत व्हिलन 'साठी' क्रॉस करून गेलेला असतो.
सगळं आयुष्य चैनीत घालवल्यावर पंधरा-वीस मिनिटं मार खाऊन पत्ता कट झाला तर काय वाईट आहे..!?
वर मठ्ठ हिरो पहिल्या झटक्यात न मारता एकदा पुन्हा चान्स देत असतो.
तेव्हा झटका झाला आणि हिरोला परत मारता आलं तर हिरोच्या पुनर्जन्माची अजून एक राउंड होईपर्यंत अजून पंचवीस तीस वर्ष चैन करता येईल ती वेगळी...!!
हिरोसारखं विधवा माँ आणि अंधी बेहेन बरोबर गरिबीत दिवस काढत, फॅमिली प्रॉब्लेम सोडवत जगण्यापेक्षा...
बियर पीत स्विमिंग टॅंकमधल्या ललना बघत पूल बेडवर पडायला मिळणारी वयाची 'साठी' प्रेफरेबल नाय काय..!?
दुर्जन प्रणव

No comments:
Post a Comment