इंटरस्टेट शिफ्टिंग करायची आमची पहिलीच वेळ. त्यात कुंपणीवाले म्हणाले आम्ही शिफ्टिंग करून देणार. म्हणलं मग होऊ द्या खर्च.. टेन्शन नाय घरचं..!? प्रोफेशनल होम रीमुवलिस्टना काँट्रॅक्ट दिलं.
ठरलेल्या दिवशी सकसकाळी दोन गौरवर्णा हातात रिकामे बॉक्सेस, डक्ट टेप आणि पांढऱ्या स्वच्छ कागदाचा ढिगारा घेऊन समोर हजर. घरात हालचाल करणाऱ्या सजीव वस्तू सोडल्या तर जे समोर येईल कागदात गुंडाळून खोक्यात भरायचा त्यांनी जो सपाटा लावला की विचारू नका.
मी आपलं ऋचाला सांगून ठेवलं.. जरा उड्या मारणं, गाणी म्हणणं करत राहा. ह्यांचा काय भरोसा नाही. गुंडाळून भरतील खोक्यात. आम्ही रात्री एयरपोर्टला घालून जाण्यासाठी हँगरला लावून ठेवलेल्या कपड्यांपासून ते घर स्वच्छ करायला आणलेल्या मित्राच्या व्हॅक्युम क्लिनरपर्यंत सगळ्या वस्तू खोक्यात गायब. माझ्या एका मित्राच्या गारबेज बिनमधला कचरा पण पॅक करून नेला होता म्हणे ह्यांनी. तीन आठवड्यांनी सामान मिळाल्यावर काय झाडं उगवली होती का काय माहित त्यातून.
पण हे पॅकिंगचं फार काही वाटलं नाही. वैताग आलाय तो ही खोकी उघडताना. ते आपल्यालाच करावं लागतं. तुम्ही बसा पर्यावरणाच्या नावाने नवस बोलत.. इथे एकेक फालतू चमचा आणि प्लॅस्टिक डबा देखील डबल A1 साईजचे पेपर वापरून पॅक केले आहेत. काही काही वस्तू तर अक्षरशः तिकडेच फेकून दिल्या असत्या तर बरं झालं असतं असं वाटतंय. वस्तूची दोन डॉलर्स पण किंमत नाही आणि त्याचा दिमाखच केवढा...!!
फोटोत दिसणाऱ्या काही मोजक्या काचेच्या बरण्या एकूण 'सत्तावन्न A1 साईजच्या' कागदात गुंडाळलेल्या होत्या. अशी जवळ जवळ पस्तीस खोकी आम्ही गेले तीन दिवस उघडत आहोत. मोकळ्या खोक्यात ठासून कागद भरून.. त्यावर ऋचा उभी राहून कॉम्पॅक्ट भरलेली आत्तापर्यंत आठ कागदाची खोकी झालीयेत...!!!
घरातल्या एकूण एक वस्तू साडेतीन हजार किलोमीटर्सचा प्रवास करून एक ओरखडाही न येता सही सलामत पोचल्या ह्याचं कौतुक करू की एवढा हजार पानी पांढरा स्वच्छ कागद वाया गेल्याचं आणि त्यासाठी झाडं तोडल्याचं वाईट वाटून घेऊ...!?
प्रणव.

No comments:
Post a Comment