आयुष्यात लै काय काय बघितलं... हेच बघायचं राहिलं होतं. तुम्ही कुणी पण ही गोष्ट कधीच पाहिली नसणार हे मी पैज लावून सांगू शकतो.
"प्रत्यक्ष भजनसम्राट श्री श्री श्री (तीन बायका आहेत म्हणून तीनदा) अनुपजी जलोटाजी... सोता दस्तुरखुद्द... बॅकग्राउंडला तबल्यावर त्रिताल वाजत असताना... हातात पेटी घेऊन... जोक्स सांगत आहेत.. I repeat... विनोद सांगत आहेत...!!"
शुद्धीवर आला असाल तर पुढे वाचा...
ह्या त्रिदेव्यांच्या प्राणनाथाला तशीही त्याच्या भजनामध्ये बडबड करायची जुनी खोड आहेच. 'एक सवाल और उसका जवाब प्रस्तुत करता हूं।' अशी प्रस्तावना करून डुलक्या घेत ताटकळलेल्या श्रोत्यांना कोमामध्ये ढकलायचं पवित्र काम दर कार्यक्रमात अगदी ठरलेलं...!!
भजनाच्या मध्ये-मध्ये जशी चतकोर तान पूर्ण व्हायच्या आत रेकॉर्ड केलेल्या टाळ्या ऐकायला येतात तसं ह्यात जोकची अर्धी ओळ पूर्ण झाली की हसण्याचं रेकॉर्डिंग प्ले होतं..!!
श्रोत्यांच्या आनंदाचा परमोच्च बिंदू म्हणून... "मैय्या मोरी मैं नही माखन खायो"ला यशोदा मातेनं जवळ घेतल्यावर ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं तसं दोन जोकच्या मध्ये भजनसम्राट सरगम गायला लागल्यावर आपल्याला होतं...!!
लिंक दिल्याबद्दल माझे आभार नंतर मानलेत तरी चालेल.. आधी ह्या सुवर्णपात्रीदुग्धशर्करायोगाचा आनंद लुटायची संधी सोडू नका...!!
प्रणव
http://mio.to/album/Anup+Jalota/Hilarious+Jokes+By+Anup+Jalota+%282016%29

Hilarious... Your blog is way funnier than his jokes. Just when I thought I've seen everything
ReplyDelete