च्यायला... 'ऑक्टोबरच्या २० तारखेला संध्याकाळी ७ वाजून ४९ मिनिटांनी' मी १०० च्या ऐवजी ११२.५ च्या स्पीडनी गाडी चालवली म्हणे.. पापं करून विसरून जायच्या आजच्या जगात ही महिन्यापूर्वीची कुचकामी गोष्ट फोटोसहित घरी पाठवली आहे मेल्यांनी..
आपल्याकडे पोलीस जसा वळणावरच्या सिग्नलला पानाच्या टपरीमागे लपून बसतो आणि आपण सिग्नल तोडून पुढे आलो की भस्सकन पुढे येतो तसं... इथे स्पीड कॅमेरा झाडाच्या मागे दडवून ठेवलेला असतो. जवळपास एकही पोलीस किंवा लक्षात येईल अशी व्यक्ती नसते.
काहीवेळा रस्त्याच्या बाजूला एखादी पांढरी गाडी उभी असते. तुम्ही बेसावधपणे पुढे जाता आणि ह्या गाडीच्या मागच्या काचेतून फच्चाक्कन तुमच्या मुखकमलावर फ्लॅश पडतो. अश्यावेळी फोटोला एक केविलवाणं हास्य देणं आणि पंचवीस दिवसांनी लागलेल्या चंदनानी थंडगार पडणं एवढंच तुमच्या हातात उरतं.
भुतांच्या जोडीसारखे हे दोन कॅमेरे आडबाजूला ट्रायपॉडवर दबा धरून बसतात आणि मग दिवसभर बकरे गोळा करतात... माझ्यासारखे..!! आपल्याकडे 'मामा'ला पटवून शे-दोनशे टिकवले की थोडक्यात सुटता तरी येतं. इथं पटवायला बोलणार तरी कुणाशी...!?
साला दोनशे डॉलर्समध्ये कॅसिओ जी शॉकचं काय वंटास घड्याळ आलं असतं यार.. नाहीतर एखादी DSLR बेसिक लेन्स.. Xbox च्या काही गेम्स, ब्ल्यू-रे क्वालिटी काही मूव्हीच्या ओरिजिनल कॉपीज... गेला बाजार एखादं छोटेखानी ड्रोन... श्या:..!!
आता दोनशे डॉलर्स घाला ह्यांच्या म(बीsssप)वर...!!
प्रणव
#INDvsAUS

No comments:
Post a Comment