ऋचा चला उठा... आज हॅप्पी न्यू इयर सुरु होणार आहे. आपलं मराठी नवीन वर्ष..!!
(झोपेतच डोळे किलकिले करून अचंबित होत) आत्ता कसं काय नवीन वर्ष? 2016 मिड इयरमध्येच?
अगं ते वेगळं. हे आपल्या राजाने त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळेस सुरु केलं. १९३८ वर्षांपूर्वी. शिवाजी महाराजांनी ते राजा झाल्यावर त्यांचं 'शक' सुरु केलं. म्हणजे ती तारीख 'एक' समजून आपल्या नावाने कॅलेंडर सुरु करायचं..!!
म्हणजे आपण स्वतः राजा झालं की स्वतःच कॅलेंडर काढता येतं? आणि आपल्याला पाहिजे तो डे, मंथ आणि इयर..!?
हो तसंच काहीतरी... आता बास झाल्या गप्पा. आपण इंडियात असतो तर सुट्टी असती स्कुलला. तुला नाहीये इथे. लास्ट डे... फन फ्राय डे... चला आवरा भरभर...!!
(तिथल्या तिथे बेडवर उभं राहून, बेडच्या साईडवर एक पाय वर ठेवत ऑर्डर सोडल्याच्या आवेशात) बाबा, तू मला प्रिन्सेस म्हणतोस ना? मग ह्या प्रिन्सेसची एक अनौन्समेंट आहे... "आजपासून 'प्रिन्सेस ऋचा' कॅलेंडर सुरु होत आहे आणि आज पहिलाच 'संडे' म्हणून डिक्लेर करण्यात येत आहे होsss...!! जे कोण सगळे बेडच्या बाहेर गेलेत त्यांनी लगेच बेड मध्ये जावे होsss... आज बाबाला ऑफिसला आणि मला स्कुलला सुट्टी आहे होsss...!!!
आणि खदखदून ससा दुलईमध्ये शिरला देखील..!!
हॅप्पी पाडवा रे बाबू..!!
प्रणव

No comments:
Post a Comment